आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका, 3 ठिकाणांहून १५०० संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुंकू, गुलालाची मुक्त उधळण, मातेचा गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात आदिमाया दुर्गादेवीच्या मंगळवारी मिरवणुका निघाल्या. दुपारी दीड वाजता शहरातील प्रमुख शक्तिपूजा मंडळांनी सवाद्य मिरवणुका काढल्या. चार पुतळा परिसरातील शमी वृक्षाजवळ सीमोल्लंघन करत या मिरवणुका पार पडल्या.

ग्रामदेवी अशी ख्याती असणाऱ्या श्री रूपाभवानी मातेच्या मंदिरात सकाळी घटपूजन झाले. यावेळी पुजारी सचिन पवार, बंडू पवार, सागर पतंगे, अनिल पतंगे, गौरव जक्कापुरे, शाहू शिंदे, भय्या दहीहंडे, अमोल यादव तर मसरे परिवारातील तम्मा मसरे, मल्लिनाथ, सारंग, सुनील, अनिल, मनीष, प्रतीक मसरे, संदेश भोगडे, बाळासाहेब मुस्तारे, राजशेखर हिरेहब्बू, प्रकाश वाले, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे आदी उपस्थित होते.

संबळ,ताशा आणि ढोल : संपूर्णमिरवणुकांत बहुतांश मंडळांच्या लेझीम पथकांना साथ देण्यासाठी संबळ, ताशा, ढोल, एकतारी आदी पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. तसेच सनई, तुतारी, पिपाणी आणि विविध वाद्यांचे आवाज काढण्यासाठी ड्रम ट्रंपेट यांची साथ होती. आझाद हिंदच्या मिरवणुकीत घोड्याच्या रूपातील नृत्य हे वैशिष्ट्य होते तर पूर्व भागातील विविध मंडळांनी साहस चित्तथरारक कसरती मिरवणुकीत सादर केल्या. त्या पाहण्यासाठी नागरिकांनी चौकाचौकात गर्दी केली होती.

यांच्यानिघाल्या सवाद्य मिरवणुका : संग्रामतरुण मंडळ, नवजवान गल्ली, वडार समाज शक्ती मंडळ, जनी मिल चाळ, वारद चाळ तरुण मंडळ, मेकॅनिकी चौकातील आझाद हिंद मंडळ, प्रतापनगर, मेघराज नवरात्र मंडळ, तुळजापूर वेस अग्रमानिनी, शाहीर वस्ती जागृती माता, बाळीवेस नवरात्र मंडळ, गवंडी गल्ली, पत्रा तालीम, शिंदे चौक, भागवत चाळ युवक मंडळ, भारतीय चौक भवानी माता, बेगम पेठ सरदार वल्लभभाई पटेल तरुण मंडळ, गवळी समाज मंडळ, लष्कर जगदंबा चौक शक्तिपूजा मंडळ, माणिक चौक मधला मारुती व्यापारी शक्तिपूजा मंडळ, मराठा वस्ती श्री शिवगंगा नवरात्रोत्सव मंडळ, नीलानगर नवरात्र मंडळ, पाणीवेस, टिळक चौक नवरात्र मंडळ, हिंगलाज माता हिंगुलांबिका देवस्थान, चौडेश्वरी मंडळ, श्री युवा चैतन्य मंडळ, आंध्र युवक मंडळ, शेळगीतील बनशंकरी नवरात्रोत्सव मंडळ, दाधिच समाज दधिमती माता माताराणी उत्सव मंडळ, कालिका देवस्थान, जय मल्हार तालीम संघ, मेकॅनिक चौक आझाद हिंद शक्तिपूजा आदींसह विविध मंडळांनी वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहराच्या तीन भागांतून सदंड पथसंचलन केले. या संचलनावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत सर्वांचे स्वागत केले. शहरातील विडी घरकुल, जुळे सोलापूर आणि दमाणी नगर या भागातून सकाळी सात वाजता संचलनास सुरुवात झाली. यावेळी जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याचे नियोजन सचिन सुरवसे यांनी केले होते. नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या. या संचलनावेळी शहर संघचालक राजेंद्र काटवे, जिल्हा कार्यवाह अशोक संकलेचा, किशोर देशपांडे, शहर कार्यवाह जगदीश करे, रंगनाथ बंकापूर, डॉ. सतीश वळसंगकर, महेश अंदेलीसह दयानंद, अशोक शिवाजी गटाचे मिळून दीड हजार स्वयंसेवक होते.
बातम्या आणखी आहेत...