सोलापूर- जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी मुख्य कार्यालयाच्या सभागृहात झाली. पावणेदोनच्या सुमारास सभेस सुरुवात झाली. दोन वाजेपर्यंत विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले. विषय पूर्णपणे वाचण्याअगोदरच ‘मंजूर मंजूर’ अशा घोषणा उपस्थितांतून आल्या. त्यामुळे फक्त २५ मनिटांत ही सभा संपली.
सभेची वेळ दुपारी दोनची होती. तत्पूर्वीच सभागृह खचाखच भरलेला होता. पावणेदोनच्या सुमारास बँकेचे अध्यक्ष दिलीप माने यांचे मंचावर आगमन झाले. त्यानंतर सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे यांनी विषय वाचण्यास सुरुवात केली. ‘मंजूर मंजूर...’च्या घोषणांबरोबरच ते वाचत राहिले. १५ मिनिटांत विषय संपले. त्यानंतर लेखापरीक्षण करणारे एन. आर. वाघचवरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे भाषण संपताच, श्री. माने यांनी अध्यक्षीय भाषण केले. माढ्याच्या संजय पाटील-घाटणेकर यांनी शेतीकर्जे देण्याविषयी सूचना केली. त्यांच्याशिवाय एकानेही तोंड उघडले नाही, माने यांच्याशिवाय दुसऱ्या संचालकाने ‘ब्र’ शब्द काढला नाही. अतिशय शांततेत ही सभा झाली.
गत आर्थिक वर्षात अनुत्पादक कर्ज (एनपीए)चे प्रमाण २३.४९ टक्के होते. ते यंदा २७.७९ टक्के झाले. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे १० टक्क्यांच्या आत प्रमाण हवे.
गत आर्थिक वर्षात २९७२३५.८८ लाखांच्या ठेवी होत्या. चालू वर्षात २८७८६८.७४ लाख झाल्या. ९३ कोटी रुपयांच्या ठेवी कमी झालेल्या आहेत. त्या वाढवणे.
गत आर्थिक वर्षात १९ कोटी २२ लाख ४३ हजार रुपयांचा निव्वळ नफा होता. यंदा कोटी ५८ लाख ५३ हजार रुपयांचा नफा झाला आहे. तो वाढवावा.
‘एनपीए’ वाढला तरी टाळ्या
सभेपुढीलविषयांवर चर्चा नाही. मंजूर मंजूर म्हणता म्हणता काही गोष्टींवर उपस्थितांनी टाळ्याही दिल्या. चांगल्या गोष्टींवर टाळ्या मिळाल्याच, ‘एनपीए’ वाढल्याचा आकडा ऐकूनही टाळ्या वाजल्या. विषयांचे गांभीर्यच कुणाला नव्हते. थकित कर्जे कुणाकडे अडकली, वसुली का होत नाही, याबाबत जाब विचारणारा एकही सभासद उभा राहू शकला नाही.
होते केवळ ज्येष्ठ...
सभेसाठीखासदार विजयसिंह मोहिते नेहमी येत असतात. परंतु यंदा ते नव्हते. अशा दादा नेत्यांची अनुपस्थित प्रकर्षाने जाणवली. गणपतराव देशमुख, दिलीप सोपल, बबनराव शिंदे, सिद्रामप्पा पाटील, दीपक साळुंखे, रणजितसिंह मोहिते, रश्मी बागल आदी संचालक आले नाहीत. ज्येष्ठ संचालक सुधाकर परिचारक, भाई एस. एम. पाटील, राजन पाटील, संजय शिंदे, चंद्रकांत देशमुख हे उपस्थित होते.
बँक बुडण्याची शंका नको
^दुष्काळ,गारपीट, वादळवारे, साखरेचे दर उतरले, उसाला एफआरपी नाही, अशा सर्व बाबींचा सामना करीत बँकेचा कारभार सुरू आहे. अडचणीतून मार्ग काढत बँकेने लेखापरीक्षणाचा वर्ग ‘क’मधून ‘ब’ वर्गात आणला. पीककर्जाची वसुली मोठ्या प्रमाणात थकित असतानाही १११ टक्के पीककर्जाची उद्दिष्टपूर्ती झाली. शेतकरी हित समोर ठेवूनच काम करताे आहोत. त्यात कुठलेच राजकारण नाही. ऑगस्टपासून पीककर्जे देऊ पण पीक पाहून. यासंदर्भात महसूल आणि सहकार खात्याची सूचना आली. कृषी अधिकाऱ्याचा दाखला आणि ठिबक या बाबी पाहूनच पीककर्ज द्यायचे. त्याचे पालन केले जाईल. ही स्थिती लक्षात घेता बँक बुडण्याची कुणी शंका घेऊ नये.” दिलीपमाने, अध्यक्ष
~ ९७२
९.५ %
~ १२
कोटी ७६ लाखांची एकूण गुंतवणूक झाली
कोटी राज्य सहकारी बँकेची देयता कमी झाली आहे.
भांडवल पर्याप्तता (सीआआर) झाली आहे.
बँकेच्या भागभांडवल अाणि स्वनिधीत वाढ झाली
नफ्यात निम्म्याहून अधिक घट; ‘एनपीए’ तब्बल २७.७९ टक्के
वैधानिक लेखापरीक्षक म्हणून एन. आर. वाघचवरे यांनी चांगल्या गोष्टी आणि काही सुधारणावादी मुद्दे मांडले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी झाली. त्या वेळी बोलताना अध्यक्ष दिलीप माने. मंचावर उपस्थित संचालक मंडळ