आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीसीसी निवडणुकीचे आजपासून पडघम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक अखेर बुधवारी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.टी. लावंड यांनी जाहीर केली. गुरुवार दि. १९ ते नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. अर्ज दाखल करण्यापासून ते माघार ही प्रक्रिया २१ दिवस असणार आहे. सहकार कायद्यातील दुरुस्तीमुळे बँकेत आता २३ ऐवजी १९ संचालक असतील. विद्यमान संचालकांपैकी बहुतांश नेते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधातही इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होणार आहे.
लवकरच पॅनेल घोषित करू
^वरिष्ठांनी तीन वर्षांपूर्वी माझी अध्यक्ष म्हणून निवड केली होती. या काळात मी ऑनलाइन बँकिंग पूर्ण केले. कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी, देयके याबाबतही निर्णय घेतले. थकबाकी वसुलीसाठी कोर्टातही धाव घेतली. काही सहकारी नाराज झाले, तरी मी बँकेच्या हिताला प्राधान्य दिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवणार असून दोन दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत पॅनेल जाहीर करण्यात येईल.'' दिलीप माने, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, सोलापूर'

निवडणूक कार्यक्रम...
Á १९ ते २३ नोव्हेंबर - या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणे
Á छाननी-२४ नोव्हेंबर
Áपात्रउमेदवारी यादी प्रसिद्ध - २६ नोव्हेंबर
Áअर्जमागे घेण्याची मुदत - १० डिसेंबर
Áमतदान २१ डिसेंबर
Áमतमोजणी-२२ डिसेंबर.

मंडळाची रचना
Áसहकार कायद्यातीलबदलानुसार संचालक मंडळ २३ ऐवजी १९ जणांचे असेल.
Áबँकेशी संलग्नशेतकरी सहकारी पतपेढ्या, विविध कार्यकारी सेवा संस्था, कृषक सोसायट्या यांच्या वतीने प्रत्येक तालुक्यातून एक संचालक याप्रमाणे ११ प्रतिनिधी,
Á महिलाप्रतिनिधी-
Á अनुसूचित जातीवा जमातीतील सदस्य -
Á इतर मागासवर्गसदस्य -
Á विमुक्तजाती,भटक्या जमाती -
Á कृषीपणनसंस्था शेतीमाल प्रक्रिया संस्था -
Á इतरशेतीसंस्था (दुग्ध संस्था व्यक्ती सभासद) -
Á नागरीबँका,पतसंस्था, पगारदार, पाणी पुरवठा, कंझ्युमर्स, औद्योगिक संस्था -