आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तावरवाडीच्या युवकाचा सडलेला मृतदेह सापडला; 4 दिवसांपासून होता बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी- चार दिवसांपूर्वी पार्टीसाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या तावरवाडी येथील आकाश ऊर्फ अक्षय नारायण बारंगुळे (वय २४) याचा रविवारी (दि. २६) शहराजवळील कुर्डुवाडी रस्त्यावरील तिरकस पुलानजीक मृतदेह आढळला. रस्त्याच्या खालच्या बाजूला झुडुपात मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. याप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, पोलिसांनी त्या रात्री त्याच्या समवेत असलेल्या मित्रांची चौकशी सुरू केली आहे. ताडसौंदणे येथील दुहेरी हत्याकांडाने वातावरण सुन्न असतानाच या युवकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. 


तावरवाडी येथील आकाश ऊर्फ अक्षय हा बुधवारी (दि.२२) रात्रीपासून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीही तो घरी परतल्याने त्याच्या नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. शुक्रवारी (दि.२४) त्याची आई आशा बारंगुळे यांनी येथील पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आकाशची मोटारसायकल येथील तिरकस पुलाच्या पुढे कुर्डुवाडी रस्त्याच्या कडेला मिळाली. फक्त मोटारसायकल मिळून आल्याने भीती व्यक्त होत होती. पोलिसही शोध घेत होते. त्याचा मोबाइलही बंद होता. रविवारी तिरकस पुलाजवळील झुडुपात आकाशचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.


उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, फौजदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी घटनास्थळी माहिती घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बार्शी शहर पोलिसांत अकस्मात मृत अशी नोंद झाली आहे. 


मित्रांसोबत पार्टी 
बेपत्ता झालेल्या दिवशी रात्री आकाश मित्रांसमवेत पार्टीत होता. कुटुंबीयांकडून विचारणा झाल्यानंतर थोड्या वेळात येणार असल्याचे सांगितले. मात्र तो परतलाच नाही. जेथे त्याची मोटारसायकल सापडली त्यापासून दूर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. 

बातम्या आणखी आहेत...