आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४८ तासांत ५० कावळ्यांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मानवाच्या मृत्यूनंतरच्या पिंडास कावळा शिवल्यानंतर मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. मृत्यूनंतर माणसांना मुक्ती देणारे कावळे अचानक मृत्युमुखी पडत आहेत. भोगाव येथील महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये गेले दोन दिवसांत सुमारे ५० कावळ्यांचा मृत्यू झाला. कावळे मृत्युमुखी पडत असल्याने पक्षिप्रेमी चक्रावले आहेत.

शहरालगतच्या भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील ५५ एकर क्षेत्रावर महापालिकेच्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा आहे. कचऱ्यात येणारे खराब मांस इतर घटकांसह मोकाट कुत्री, कावळे, बगळे काही पक्षी अन्न शोधतात. वीजनिर्मिती प्रकल्पातील कूपनलिकेतून पडणाऱ्या पाण्याने कावळे तहान भागवतात. पण, गेल्या दोन दिवसांपासून कावळे मृत्युमुखी पडत आहेत.

रसायन सेवनामुळे मृत्यू
^भोगाव कचरा डेपो परिसरात रसायन सेवन करत असल्याने कावळ्यांचा मृत्यू होत असावा असा संशय आहे. डाॅ.पंकज रापतवार, पशुवैद्यकीय अधिकारी

^कचरा डेपोत अचानक कावळे मृत्युमुखी पडण्याच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. काही विषारी घटक खाण्यात आलेत की रोगाची साथ याबाबत शोध आवश्यक आहे. पप्पू जमादार, पक्षिमित्र,नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल