आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबर अखेर स्थापणार ऊसतोड कामगार मंडळ, प्रकाश मेहता यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- राज्यात येत्या डिसेंबरअखेर ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात येईल. त्यानंतर त्यांचे प्रश्न सुटतील, अशी माहिती गृहनिर्माण कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी येथे दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी ते येथे आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील पोलिसांना हक्काची घरे उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून मेहता म्हणाले, राज्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न गंभीर आहे. एकट्या मुंबईमध्ये ६० हजार पोलिस आहेत. त्यांच्यासाठी केवळ ३० हजारांच्या आसपास घरे आहेत. त्यांना घरे दिली जातील. तसेच सफाई कर्मचाऱ्यांनाही राहण्यासाठी घरे नाहीत. त्यांनाही घरे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पाच वर्षांपासून काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले. या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, व्यपस्थापक विलास महाजन, तहसीलदार गजानन गुरव, तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित होते.
ग्रामीणभागातही म्हाडामार्फत घरे देणार
इंदिराआवास, पंतप्रधान आवास, राजीव आवास आदी विविध घरांच्या योजनांच्या लाभार्थींसाठी म्हाडामार्फत घरे देण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री मेहता यांनी सांगितले. तसेच म्हाडाकडे आठ हजार कोटींचा निधी अाहे. त्याचा यासाठी वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

मंगळवेढ्यातील उत्खन्नातील सोन्याची तपासणी सुरू
मंगळवेढातालुक्यातील गावांमध्ये उत्खन्नातून सोन्यासारखा धातू किती प्रमाणात आहे, याची केेंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू आहे. जर त्यातून सोने काढणे शक्य असल्याचे स्पष्ट झाल्यास राज्यालाही फायदा होईल, असे कामगारमंत्री मेहता म्हणाले.