आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे. यंदाच्यावर्षी खरीप रब्बी या दोन्ही हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषद कृषी समितीची बैठक सभापती पंडित वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याच्या मागणीवर चर्चा झाली. कृषी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोलापूरचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यात करण्याचे जाहीर केले आहे. परंतु भविष्यात पुन्हा आणेवारीचा नियम दाखवून ठरावीक तालुका गावांचा दुष्काळग्रस्तामध्ये समावेश होतो. यापूर्वी असे प्रकार सर्रास घडले असून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. यंदाच्यावर्षी पावसाने आेढ दिल्यामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. रब्बी हंगामातील पेरणी झाली पण परतीच्या पावसाने आेढ दिल्याने पिकांची चांगली उगवण झाली नसल्याने तोही हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. मागेल त्यास शेततळे मंजूर करून तातडीने अनुदान द्यावे, असा ठराव बैठकीत मांडण्यात आला. तो ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे, कृषी सभापती वाघ यांनी सांिगतले.