आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रमाणपत्र अर्ज, शुल्क ऑनलाइन, नोव्हेंबरपर्यंत करता येईल अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; सोलापूर विद्यापीठाचा अकरावा पदवीदान समारंभ डिसेंबरमध्ये होत आहे. पदवी प्रमाणपत्र घ्यायचे असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज शुल्क भरता येईल. ही सुविधा यंदापासून सुरू केली आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून नोव्हेंबरपर्यंत शुल्कसह अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील यांनी दिली.

सोळा अंकी पीआरएन क्रमांक असलेले विद्यार्थी सदरचे शुल्क हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंग कार्डद्वारे भरू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विद्यापीठात शुल्क भरण्याचे श्रम वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर सदरचे शुल्क" वित्त लेखाधिकारी, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर' यांच्या नावे काढलेल्या धनाकर्षाद्वारे किंवा अॅक्सिस बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारेही हे शुल्क विद्यार्थी भरू शकतात.

सुविधा अंतर्गत १६ अंकी पीआरएन क्रमांक असलेल्या दहा अंकी पीआरएन क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांकरता दोन स्वतंत्र लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

अर्ज करण्यापूर्वी हवी ही तयारी
ऑनलाइनअर्ज सादर करण्यापूर्वी फोटो, स्वाक्षरी, अंतिम वर्षाची गुणपत्रिकेची स्कॅन केलेली जेपीईजी फारमॅटमधील फाइल अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सोबत असणे गरजेचे आहे. समारंभाची माहिती एसएमएस द्वारे कळविली जाईल. पदवीप्रमाणपत्र टपालाद्वारे मिळविण्यासाठी आवश्यक असलेला अचूक संपूर्ण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने अपलोड केलेला फोटो त्याची स्वाक्षरी ही पदवी प्रमाणपत्रावर छापली जाणार आहे. याबाबत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. नोव्हेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता केंद्र (०२१७ - २७४४७६५) या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.