आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉवेल, नॅपकीन घेण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरू, खासदार अॅड. शरद बनसोडे यांचे आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात उत्पादित होणारे टॉवेल, नॅपकीन केंद्रीय कार्यालयांत जाण्यासाठी पंतप्रधानांकडे आग्रह धरू, असे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी येथे सांगितले.

पद्मशाली स्मशानभूमीत बांधलेल्या ५० हजार लिटर क्षमतेच्या टाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या कामासाठी त्यांनी १५ लाख रुपये निधी दिला. त्याबद्दल पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी सत्कार केला. या वेळी सरचिटणीस सुरेश फलमारी, उपाध्यक्ष बालराज बोल्ली, नगरसेवक नागेश वल्याळ, अविनाश बोमड्याल, रामेश्वरी बिर्रू, राधिका पोसा, श्रीकांचना यन्नम, अनिता कोंडी आदी उपस्थित होते.
 
पंतप्रधानांच्या दौऱ्यात सोलापूरचे प्रश्न मांडू
फताटेवाडी येथील आैष्णिक विद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सोलापूरला येणार आहेत. त्यांच्या समोर सोलापूरचा आैद्योगिक प्रश्न, कामगारांचे प्रश्न मांडू. जेणेकरून केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालयांमध्ये येथील टॉवेल, नॅपकीन गेले तरी बऱ्यापैकी प्रश्न सुटतील. अॅड.शरद बनसोडे, खासदार
 
विडी कामगारांना पर्याय
विडीआणि यंत्रमाग उद्योगात अनेक संकटे आली. त्यात सरकारी हस्तक्षेप झाला तरच प्रश्न सुटतील. याकडे संस्थेचे माजी सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना अॅड. बनसोडे म्हणाले, “सध्या देशभर कौशल्य विकास कार्यक्रम सुरू आहे. मागतील त्याला प्रशिक्षण आणि रोजगार देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पच हाती घेण्यात आला. त्याच्या माध्यमातून विडी कामगारांना पर्यायी रोजगार देण्याचे प्रयत्न करू.”
 
पालकमंत्री अनुपस्थित
पालकमंत्रीविजयकुमार देशमुख या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मात्र, त्यांची अनुपस्थिती जाणवली. पद्मशाली समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यांना आता स्वारस्य नसल्याची कुजबूज या वेळी झाली. महापालिका निवडणुकीपासून पालकमंत्री अन् पद्मशाली समाज यांच्यातील नाराजीविषयी सातत्याने चर्चा होते. त्याचा सोमवारी पुन्हा प्रत्यय आला.
 
पद्मशाली स्मशानभूमीतील पाण्याच्या टाकीचे सोमवारी सकाळी लोकार्पण झाले. त्या वेळी खासदार अॅड. शरद बनसोडे. शेजारी महेश कोठे, सुरेश फलमारी, पांडुरंग दिड्डी, सिद्राम जिंदम, अशोक इंदापुरे, श्रीनिवास रिकमल्ले, राकेश पुंजाल आदी.
बातम्या आणखी आहेत...