आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी उपस्थित नेते. - Divya Marathi
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी उपस्थित नेते.
सोलापूर - जिल्हादुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यात शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अखिल भारतीय किसान सभेचे राज्यनेते सिद्धप्पा कलशेट्टी म्हणाले, “शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु सरकारने हा कणाच मोडून काढण्याचा निर्धार केल्याचे दिसून येते. दररोज शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतात. त्यावरील उपाय सोडून, त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचे कायदे केले जात आहेत. अशी स्थिती असताना निसर्गाची देखील साथ नाही. पावसाळा संपत आला तरी पाऊस नाही. त्यामुळे सामान्य शेतकरी मोठ्या आर्थिक कचाट्यात सापडलेला आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी १० हजार रुपयांची मदत द्यावी.”
सभेच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यात जनावरांना चारा, पिण्यासाठी पाणी, उसाला एफआरपी दर, रेशन व्यवस्थेतून धान्याचे वाटप आदी मागण्यांचा समावेश आहे. या वेळी नसीमा शेख, कुरमय्या म्हेत्रे, व्यंकटेश कोंगारी, युसूफ शेख, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, सलीम पटेल, सुलेमान शेख, नरसिंग म्हेत्रे, विल्यम ससाणे, बापू साबळे आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी उपस्थित नेते.
बातम्या आणखी आहेत...