आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला लोकशाही दिनाला अर्जदारांनी मारली दांडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला लोकशाही दिनात बोलताना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे. यावेळी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू आदी सदस्य. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला लोकशाही दिनात बोलताना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे. यावेळी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू आदी सदस्य.
सोलापूर- जिल्हाधिकारीकार्यालयात महिला लोकशाही दिनमध्ये दोन महिला अर्जदारांच्या तक्रारी सुनावणीस होत्या, मात्र संबंधित तक्रारदार महिला अनुपस्थित राहिल्याने दोन्ही अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी मात्र जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख जातीने हजर होते. अर्जदार गैरहजर असल्याने सुनावणी होण्याची पहिलीच वेळ आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात सोमवारी महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत झाला. या लोकशाही दिनात कौठाळी (ता. पंढरपूर) येथील अनुसया अटकळे मंगळवेढा तालुक्यातील महानंदा खुळे यांचे अर्ज होते. उपस्थित अधिकारी यांनी अर्जदारांची वाट पाहिली. तक्रार सोडवण्यासाठी अर्जदारच आल्याने निर्णय झाला नाही.

यावेळी जिल्हाधिकारी मुंढे यांनी मनोधर्य योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्षती सहाय्य पुनर्वसन मंडळात तक्रारी दाखल होत्या. यापैकी एक प्रकरण अंतिम चार्टशीटसाठी दाखल झाले आहे.
जिल्हाधिका-यांनी पीडितांना शासकीय आर्थिक लाभ देण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. यावेळी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, पोलिस उपायुक्त अश्विनी सानप, प्रांताधिकारी शहाजी पवार, जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली नानल, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी धर्मपाल साहू आदी उपस्थित होते.