आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरमाळा: नोटांवर लिहिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे नोटांचे विद्रूपीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चलनी नोटावर लिहिलेला मजकूर अशा प्रकारे आहे. - Divya Marathi
चलनी नोटावर लिहिलेला मजकूर अशा प्रकारे आहे.
येरमाळा - नोटाबंदीनंतर पाचशे, दोन हजार रुपयांच्या चलनात आलेल्या नवीन नोटांवर कोणताही मजकूर लिहिल्यास त्या चलनबाह्य स्वीकारू नये, अशा नोटा चलनबाह्य ठरविल्या जातील, असा रिझर्व बँकेचा नियम आहे. 
 
परंतु १०० रुपयांपर्यंतच्या मजकूर लिहिलेल्या नोटा आजही चलनात आहे. नवीन नोटांप्रमाणेच या नोटांनाही चलनबाह्य ठरवून त्या बँकेतून बदलून देण्याची मागणी व्यापारी नागरिक व्यापाऱ्यांमधून होत आहे. लिहिलेल्या नोटा स्वीकारल्यास चलनबाह्य ठरल्यानंतर स्वीकारणाऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. बँकेत भरण्यापूर्वी पेन्सीलने लिहिलेल्या नोटांवरील मजकूर खोडून व्यवहार केले जात आहेत. दरम्यान, नवीन चलनासंबंधीच्या नियमामुळे चलनाची सुरक्षितता वाढली असूनही दुसरीकडे रोजच्या व्यवहारात येणाऱ्या ५, १०, २०, ५०, १०० रुपयांच्या मजकूर लिहिल्यामुळे खराब झालेल्या आहेत. अशा नोटा स्वीकारण्यास लहान-मोठे व्यापारी नकार देत आहेत. परंतु ग्राहकांनाही व्यवहारातूनच अशा नोटा मिळाल्यामुळे व्यापारी स्वीकारून पुढच्या व्यवहारात चालवितात. यामुळे अशा नोटांवर काहीही मजकूर लिहिणारे
निर्ढावले आहेत. 
 
व्यवहारातीलनोटांची अवस्था : दररोजच्या लहान-मोठ्या खरेदी व्यवहारात १०, २०, ५०, १०० रुपयांच्या नोटांवर लिहिलेले आढळून येते. व्यापारी अशा नोटा घेण्यास नाईलाजाने तयार होतात. 

नोटांवरीलमजकूर : यानोटांवर कुणी स्वत:चे नाव लिहितात, तर कुणी हिशेब करतात. मुलींची नावे, फोन नंबर, अाश्लिल मजूकर लिहिलेला आढळतो. हा प्रकार चलनाची अवमानना करणारा आहे. 
 
बंदी घालावी 
रिझर्व बँकेने जुन्या नोटांवरही मजकूर लिहिण्यास बंदी घालावी. अशा लिहून खराब केलेल्या नोटांमुळे व्यापाऱ्यांना त्रास होतो. बँकेच्या आदेशानेच यावर नियंत्रण येऊ शकते. -समाधान बारकुल, कापड व्यापारी. 
 
तुटवड्याचेही संकट 
मजकूर लिहिलेल्या नोटा अधिक येतात. अशा नोटा व्यापाऱ्यांनी चलनबाह्य ठरविल्यास त्यावर नियंत्रण येऊ शकते. परंतु यामुळे चलन तुटवड्याचे संकटही ओढवू शकते.
-शिवलिंगशेटे, भुसार किराणा व्यापारी 
 
आदेशाने शक्य 
खराब झालेल्या नोटा यंत्राद्वारे व्यवहारात वापरताना बँक कर्मचाऱ्यांचीही गैरसोय होते. आरबीआयने अशा नोटा चलनबाह्य ठरविण्याचे आदेश दिल्यास नियंत्रण येऊ शकते.
-शंकर येरावार, शाखाव्यवस्थापक, एसबीआय. 
 
ग्राहक, पतपेढ्या, बँकाही जबाबदार 
दररोजच्या व्यवहारात ग्राहक बँकेत गेल्यावर बँकेच्या स्लिपवर नाणेेवारी लिहिलेली असूनही नोटांवर आकडे लिहिणे, घाई-घाईत फोन नंबर लिहिणे, बँकांनी नोटांवर शिक्के मारणेे, संख्या लिहिणे, यामुळेही नोटांचा गैरवापर होताना दिसतो. शिक्के मारून नोटा खराब करण्यात पतपेढ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. नोटांवर देव-देवतांच्या नावांसोबतच अब की बार मोदी सरकार, असा शिक्का मारलेल्या नोटाही चलनात आहेत. 
 
प्रेमवीर, मटके बहादरही तरबेज 
चलनी नोटांवर मजकूर लिहिण्यात प्रेमवीरांसोबतच मटकाबहाद्दरही तरबेज आहेत. एकतर्फी प्रेम असणाऱ्या प्रेमवीराने तिच्या नावाने ‘आय लव्ह यू’, तिचा फोन नंबर, त्याच आणि तिचं ‘दिल’च्या चिन्हात नाव, असले प्रताप करण्यात येतात. 
 
बातम्या आणखी आहेत...