आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेज तुंबल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनियाची भीती; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील विविध ब्लॉकमध्ये सर्व ड्रेनेज तुंबलेले आहेत, डास अस्वच्छतेचे प्रमाण वाढलेले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने अस्वच्छता कमालीची दिसत आहे. त्यामुळे सिव्हिलमध्येच डेंग्यू, मलेरिया चिकुन गुनियाची भीती निर्माण झाली आहे. ड्रेनेज तुंबल्याने उग्र वास येत आहे. या गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. 
 
कनिष्ठ अभियंता यांनी पदभार घेतला, परंतु निधी नसल्याने देखभाल दुरुस्तीच्या समस्या सहा महिन्यापासून जैथे थे आहेत. सिव्हिलमधील आहार विभागाचे ड्रेनेज, बाह्य रुग्ण विभागातील छत खराब, बी. ब्लॉकचे संडास बाथरुम, ड्रेनेज तुंबले आहेत. सर्व ऑपरेशन थिएटरचे दरवाजे खराब मोडकळीस आलेले आहेत. बी ब्लॉकमधील ऑपरेशन थिएटरमधील फरशा खराब झालेल्या आहेत. लेबर रुम दुसऱ्या विभागात आठ दिवसांपासून हलविण्यात आले आहे. लेबर वाॅर्डात वीज पुरवठा, दरवाजे, फरशाचे नूतनीकरणाचे काम प्रलंबित आहे. सिव्हिल प्रशासनाकडून बांधकाम विभागास कळवले आहे. देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निधी नसल्याने अडचण निर्माण होत आहे. 
 
तत्कालीन अभियंता पी. रेळेकर यांची बदली झाली आहे. सध्या कनिष्ठ अभियंता म्हणून एस. दरेकर रुजू झालेत. परंतु निधीच नसल्याने दरेकर काहीच करू शकत नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण हाेत आहेत. सिव्हिल प्रशासनाकडून विविध कामे दुरुस्ती करुन द्यावीत यासाठी पत्रव्यवहार केला आहे. बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. 
 
कामे मार्गी लावू 
सिव्हिलमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. त्यातील तत्काळ गरजेची असलेली कामे लवकर केली जाणार आहेत. अधिष्ठाता कार्यालयात कार्यकारी अभियंता यांची बैठक घेतली त्यामध्ये निर्णय झाला आहे. त्यामुळे अॅनॉटॉमी बी ब्लॉकमधील लेबर वाॅर्डातील किरकोळ कामे महिन्याभरात मार्गी लागतील. 
- एस.बी. दरेकर, कनिष्ठ अभियंता, सिव्हिल 
 
बातम्या आणखी आहेत...