आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढळले ३९ डेंग्यूसदृश, डेंग्यू आजाराचे रुग्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेकडून मंगळवारी मिळालेल्या माहितीनुसार नव्याने ३९ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सात जणांना डेंग्यू झाल्याचा अहवाल आहे. डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने धुरळणी फवारणी सुरू केली आहे. मंगळवारी ३३ रुग्णांलयातून नमुने घेण्यात आले. लागण झालेल्या सातही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
डेंग्यूवर उपाय योजण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी केली आहे. उपाययोजनेची अंमलबजावणी पाहण्यासाठी मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी बाळे परिसरात भेट देऊन पाहणी केली. काही ठिकाणी फवारणी मशिनसाठी डिझेल नसल्याने कर्मचारी बसले हाेते. आवश्यक तितके डिझेल सोबत घेऊन जाण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

जनजागृतीवर भर
डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी ६० हजार पत्रके, २०० डिजिटल बॅनर वाटप केले. नगरसेवकांच्या सहकार्याने त्यांचे कार्यकर्ते घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. १५० शिक्षकांकडून जनजागृती करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ, छन्नुसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालयाच्या मदतीने जनजागृती बुधवार आणि गुरुवारी करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...