आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले सत्र संपल्यावर पुस्तके वाटपाची जाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चालू शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपले तरी नववीच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत शासनाकडून उपलब्ध झालेली मोफत पाठ्यपुस्तके पोहोचली नसल्याची गंभीर बाब समोर अाली अाहे. दैनिक दिव्य मराठीने यासंदर्भात पाठपुरावा सुरू केल्यानंतर पुस्तक वितरणाचा कागदोपत्री मेळ घालण्याचे सुरू झाले.
माध्यमिक शिक्षण विभागाने १७ नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात हजार ७५० पुस्तक संच उपलब्ध असल्याचा उल्लेख केला होता. दुसऱ्या सत्रातील शाळा सुरू होत अाहेत, तोपर्यंतच १६५० पुस्तकांचे संच शिल्लक असल्याचे सांगण्यात येत अाहे. शिक्षण संचालक कार्यालयाकडून १३ हजार ४८८ पुस्तक संच सोलापूर शिक्षण विभागाला उपलब्ध झाले अाहेत. बालभारती पुस्तक भांडारातून पुस्तके अाणण्यास दिरंगाई झाल्याचेही समोर अाले अाहे. काही विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये पुस्तके वितरीत झाली तर काहीना नोव्हेंबरमध्ये वितरीत केली जात अाहेत. झेडपीच्या शिक्षण कार्यालयात पुरेशी जागा नसल्याने मेहता प्रशालेत ठेवली होती. मुख्याध्यापक शिक्षकांना पत्राव्दारे, मेल व्हॉट्सअॅपव्दारे पुस्तके नेण्यास सांगितले. पण, शाळांनी दुर्लक्ष केल्याचे कळते.

^शाळा सुरू होताच पाठ्यपुस्तकं मिळणे आवश्यक होते. पहिले सत्र संपल्यानंतरही ती मिळाली नसल्याने पालकांवर पुस्तक खरेदीचा आर्थिक भुर्दंड पडला. मोफत योजनाचा फायदा काय? तानाजी माने, मुख्याध्यापक

^पुस्तक संचवाटप करायला सुरुवात केली आहे. परंतु संच किती शिल्लक आहेत, ते माहीत नाही, माहिती घेतो. त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल. विष्णू सरगर, प्रभारी शिक्षणाधिकारी