आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एक देशमुख होते, आता त्यांच्या मदतीसाठी आणखी एका देशमुखांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालीच काम करण्यासाठी मी वरिष्ठांकडे आग्रह धरणार आहे, असे मत नूतन मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप झाला. श्री. देशमुख म्हणाले, “बेरोजगारी, कामगारांच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करणार आहे. ‘सोलापूरचे मार्केटिंग’ याबाबत सातत्याने आग्रही आहे. येथील धार्मिक पर्यटन केंद्र विकसित करून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. सोलापूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सोलापूर एक नवीन विकासाचे केंद्र होत आहे. मेक इन इंडिया आणि ‘मेक इन महाराष्ट्र’च्या धर्तीवर ‘मेक इन सोलापूर’ यासाठी माझा प्रयत्न आहे. सोलापूरच्या विमानतळाचा पेच सुटण्यासाठी आैद्योगिकरण वाढणे आवश्यक आहे. कंपन्यांना फेऱ्या परडवल्या पाहिजेत. जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळणे हे ज्येष्ठांचे त्याग अन्् पक्षवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.”

स्थानिक संस्था हेच लक्ष्य
शहराच्या प्रश्नांबाबत विचारले असता, मला त्या प्रश्नांची जाण आहे. काही प्रश्न सुटतील. पण, काहींसाठी पाठपुरावा करणार आहे. पाणीप्रश्न सुटण्याबरोबर शुद्ध पाण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद नमामि चंद्रभागा योजनेसाठी केली आहे.
भीमाशंकरमधील नदीच्या उगमापासून ते पंढरपूरपर्यंतच्या प्रवासात नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्नशील आहोत. आगामी महापालिका जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत आम्ही दोन्ही देशमुख शहर ग्रामीण भागाची जबाबदारी घेऊन विकासाचे कार्य करू, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...