आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात देशमुखांचे यश, प्रणितींमुळे काँग्रेसची पीछेहाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून महापालिका निवडणुकीसाठी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. तिकीट वाटपात पक्ष एका बाजूला अन् या तिघांचे निर्णय एका बाजूला असे चित्र होते. या तिघांचाच वरचष्मा तिकीट वाटपात होता. त्यांचा परफाॅर्मन्स कसा राहिला, याची ही मांडणी. या मनपात भाजप सत्तेच्या जवळ पोहोचला आहे.
 
पालकमंत्र्यांची रणनीती
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात भाजपला किती जागा मिळणार? हा अौत्सुक्याचा विषय होता. पालकमंत्री देशमुख  यांच्या मतदारसंघामध्ये विजयी झालेल्या ४९ उमेदवारांपैकी २७ उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १२ वगळता २४ उमेदवार पॅनल टू पॅनल विजयी झाले आहेत. गेल्यावेळी १४ नगरसेवक उत्तर सोलापूर मतदारसंघातील होते.
 
देशमुख यांनी युती करण्याचा काटोकाट प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. मतविभागणीची भीती होती. तरीही त्यांनी हिरीरिने किल्ला लढविला अन् त्यात ते यशस्वी झाले. काँग्रेसचा पूर्णपणे सफाया झाल्याने विधानसभेसाठीची त्यांची फिल्डिंग अाणखीन मजबूत झाली अाहे. 
 
‘दक्षिण’ची गणिते जुळवली 
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही विधानसभेची गणिते जुळविण्यासाठी मतदार संघात दुसऱ्या कोणाचाच हस्तक्षपे नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच पालकमंत्र्यांच्या जवळ गेलेल्या विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांचाही पत्ता कट केला. 
 
अापल्या मर्जीतील उमेदवार देऊन त्यांना निवडून अाणण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती. शिवसेनेच्या जवळ असलेले शिवशरण पाटील, ए. जी. पाटील यांच्याबरोबर सलोखा ठेवून शिवसेनेला शह दिला. नवीन चेहरे देऊनही त्यांना अापले उमेदवार निवडून अाणण्यात यश अाले. एकीकडे महापालिकेत सत्ता अाणण्यासाठी लढणाऱ्या देशमुखांनी दक्षिण सोलापूरची सत्ता मिळविण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यात त्यांनी निम्मे यश मिळविले. 
 
कार्यशैली नडली
शहर मध्य मतदार संघातील उमेदवार ठरविण्याचे बहुतेक सर्व अधिकार प्रणिती शिंदे यांच्याकडे होते. अन्य मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यातही त्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा होती. विधानसभा पाठोपाठ लोकसभेच्या दृष्टीनेही त्यांनी कटाक्ष टाकला होता.
 
 काँग्रेस पक्षात जुन्या नेत्यांना डावलून नवीन चेहरा देण्याचा त्यांचा प्रयत्न त्या अामदार झाल्यापासून सुरू अाहे. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. त्यातच एमअायएमने पुन्हा मतविभागणी केली. त्याचाच परिणाम या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक दिसून अाला. एकूणच राजकीय कार्यशैलीने शहर मध्य मतदार संघातून त्या अापला परफाॅर्मन्स दाखवू शकल्या नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...