आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विन पौर्णिमेला भक्तीच्या जयघोषात दुमदुमली श्री येडाई नगरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरमाळा - अाईराजा.. उदो उदो... च्या जयघोषाने येरमाळा नगरी दुमदुमून गेली. गुरुवारी (दि.५) श्री. येडेश्वरी देवीच्या कोजागरी पौर्णिमा महोत्सवानिमित्त पहाटे वाजता देवीची विधिवत महापंच्चोपचार पूजा, महाअारती झाली. रात्री आठला देवीचा पालखीसह छबिना काढून कोजागरी पौर्णिमा सोहळा उत्साहात पार पडला. 
 
गुरुवारी पहाटे महाअारतीनंतर देवीला आवडत्या नागवेलीच्या बकाड्या लिंबाच्या पानाने बारवाची विधिवत महापूजा मांडण्यात अाली. रात्री वाजता देवीचे मुख्य मानकरी अमोल पाटील, दत्ता पाटील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे यांच्या शुभहस्ते पौर्णिमेनिमित्त श्री येेडेश्वरी देवीची महापंच्चोपचार महापूजा, महाअारती करण्यात आली. 
 
मंदिर परिसरात असणारे श्री गणेश मंदिर, श्री भगवान शंकर मंदिर, श्री नृसिंह मंदिर, श्री जनाई मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, श्री सीतामाता ठाणे, श्री मातंगी माता मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री वाकलाई मंदिर अादी मंदिरातील देवदेवतांयत महापूजा, महाअारती करण्यात आली. देवीचा पालखीसह छबिना काढण्यात अाला. या वेळी अाराधी गाण्यांचा मेळा, भारुडाने मंदिर परिसर दुमदुमून गेले होते. तसेच या वेळी गावकरी, आणि पुजारी मंडळींकडून पोत खेळण्यात अाला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सीतामाता ठाण्याजवळ विधिवत पालखीसह छबिना काढण्यात आला. हे पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोजागरी पौर्णिमेनिमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी दोन दिवसांपासून भाविकांनी येरमाळा नगरीत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या काळात देवस्थान ट्रस्ट येरमाळा पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने भाविकांची गैरसोय होता सुरळीत दर्शन झाले. अश्विन पौर्णिमेला हजारो भाविकांनी श्री येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. 
 
बातम्या आणखी आहेत...