आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलनामाच्या शाळेत दशलक्ष वारकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - भाविकांच्या निवासाची यंदा सोय चंद्रभागेच्या पैलातीरी पासष्ठ एकर परिसरात करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध दिंड्यांसह भाविक वास्तव्यास आहेत. त्यामुळे चंद्रभागा वाळवंटासह शेजारील पासष्ठ एकर परिसरातही भक्तांची मांदियाळी जमल्याचे चित्र दिसत होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने यंदा लक्ष घालून केलेल्या सुविधामुळे बाहेरगावच्या भाविकामधून समाधान व्यक्त करत होते.
पंढरीबाहेरही सर्वदूर रांगा
दरवर्षीयात्रेसाठी आलेल्या भाविकांची शहरात वर्दळ दिसत होती. यावर्षी मोठ्या संख्येने वारकरी यात्रेसाठी आलेले असल्याने शहरातील कोर्टी रस्त्यावर, सांगोला, सोलापूर, बार्शी तसेच मंगळवेढा अशा पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर दूरपर्यंत भाविकांच्या गाड्या, राहुट्या उभ्या असल्याच्या दिसत होत्या. पंढरपुरात बाहेरगावहून येणारे सर्व रस्तेदेखील भाविकांच्या वर्दळीने फुलून गेल्याचे चित्र दिसत होते.
सोमवारी दर्शनासाठी लागलेला वेळ.

पुंडलिकाचेदर्शन चंद्रभागे स्नान विठ्ठल दरुशने धन्य होती ।।
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तया सर्वोत्तम नुपेक्षी तो ।।

याभावनेतून सुमारे दहा लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र चंद्रभागा स्नान करून पुंडलिकराय आणि सावळ्या विठुरायाचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळ्या याचि देही, याचि डोळा अनुभवला.चंद्रभागेच्या वाळवंटात एकादशी निमित्त स्नानाची पर्वणी लुटण्यासाठी वारकऱ्यांनी पहाटे अडीच वाजल्यापासून गर्दी केली.भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चंद्रभागेचे वाळवंट वारकऱ्यांनी फुलून गेले होते.

श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे सात किलोमीटर लांब गेली होती. दर्शनासाठी २२ ते २४ तासांचा अवधी लागत होता. मुखदर्शनासाठीही भाविकांची मोठी रांग लागली होती. वारकरी संप्रदायातील या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून सुमारे दहा लाखांहून अधिक वैष्णवांनी भल्या पहाटेपासूनच चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनाची रांग आभियांत्रिकी महाविद्यालयापुढील रांझणी रस्त्यापर्यंत गेली होती.पदस्पर्श दर्शन करून पश्चिमव्दाराने बाहेर पडलेले सुदाम दशरथ लंगोटे (वय ४५, जि. नाशिक) म्हणाले, “रविवारी सकाळी दर्शन रांगेत उभा राहिलो होता. सुमारे २२ तासांनंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घडले.”
रविवारी दाखल झालेल्या कैवल्यसम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज, सोपानकाका, एकनाथ महाराज, मुक्ताबाई आदी संतांच्या पादुका रथामधून विठ्ठल विठ्ठल, माउली माउली च्या जयघोषात चंद्रभागा स्नानासाठी वाळवंटात आणल्या जात होत्या. टाळ मृदंगाच्या गजरात आणि वैष्णवजनांच्या बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल च्या जयघोषात वाळवंट दणाणून गेला होता.
वारकऱ्यांनी घेतले श्री विठुरायाचे दर्शन.
२२ तास
मंदिरापासून दर्शनासाठी वारकऱ्यांची लागलेली रांग.
१० लाख
०७ कि.मी.