आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदेश देऊनही डिजिटल फलकांवर कारवाई नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पूर्वभागासह अन्यत्र बेकायदा डिजिटल लावल्यास किंवा रस्त्यावर स्टेज उभे केल्यास ते त्वरित काढा, असा आदेश महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी मंगळवारी दिले होते. मात्र अधिकारी चालढकल करत आहेत. मंगळवारी मिरवणुका संपल्यानंतर डिजिटल काढण्यात आले, तर बुधवारी लहान डिजिटल काढण्याचे नाटक करण्यात आले.
पूर्व भागात मार्कंडेय रथोत्सवानिमित्त मिरवणूक मार्गावर दुतर्फा डिजिटल फलक लावले होते. बेकायदेशीर डिजिटल फलक आणि रस्त्यावरील स्टेज टाकले होते. उद्देश संपल्यानंतर लावणाऱ्यंनीच फलक स्वत:हून काढले असते.

कारवाईचे झाले नाट्य : बुधवारीडिजिटल काढणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, फक्त पाहाणी करण्यात आली. यावर आयुक्तांनी त्वरित काढायला लावतो, असे सांगितले. प्रत्यक्षात दुपारी चार वाजेपर्यंत कन्ना चौक ते दत्त नगरपर्यंतचे फलक आहे तसेच होते. सायंकाळी पाच वाजता डिजिटल काढण्याची मोहीम सुरू केली. लहान फलक काढले. मोठे तसेच ठेवले.

^पाहणी सुरू असून सर्व बेकायदा डिजिटल रस्त्यावरील स्टेजचे फोटो काढून पोलिसांना देण्यात येणार आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर अतिक्रमण काढू. लहान आठ फलक काढले. मोठे फलक लावणाऱ्यांनी अर्ज केला आहे. पोलिसांनी अजून परवानगी दिली नाही. उद्या निर्णय होईल.” आर.डी. जाधव, झोन अधिकारी

^बेकायदा डिजिटल फलक आणि स्टेज काढण्याचेच आदेश दिले होते. लगेच सर्व डिजिटल काढायला सांगतो.” विजयकुमार काळम पाटील, आयुक्त

^डिजिटल फलक काढण्याचे काम अतिक्रमण विभागाकडून केले जात नसून झोन कार्यालयाकडून केले जात आहे. मंगळवारी रात्री झोन कार्यालयाला मदत केली.” रामचंद्र पेन्टर, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभाग
बातम्या आणखी आहेत...