आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आॅर्किडमध्ये डिजिटल क्लासरूमचा आज शुभारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शैक्षणिक क्षेत्रातील नवनवी आव्हाने पेलत नागेश करजगी आॅर्किड स्कूल विविध उपक्रमात अग्रभागी असते. आता महाराष्ट्रीतील पहिल्या लर्निंग डिजिटल क्लासरूमचा प्रारंभ शनिवारपासून या स्कूलमध्ये होत आहे. बदलत्या जागतिक आव्हानांना तोंड देणारे, कृतीशीलतेची जोड असणारे सक्षम शिक्षण याद्वारे विद्यार्थ्यांना मिळेल, असा विश्वास आॅर्किड स्कूलचे अध्यक्ष कुमार करजगी यांनी व्यक्त केला.
शिक्षक, विद्यार्थ्यांचे लॅपटॉप इंटरनेटशी कनेक्ट असतील. लॅपटॉपमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रश्न विचारण्याची सुविधा आहे. डिजिटल स्वरूपातील धडे असल्याने ते समजणे अतिशय सुकर होईल. आॅर्किड स्कूलमध्ये सीबीएससी पॅटर्न असल्याने अभ्यासक्रमाचे डिजिटल स्वरूप लॅपटॉपमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. पालकांकडून कोणतीही अतिरिक्त फी घेता दर्जेदार शिक्षण, अद्ययावत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एका क्लासरूमच्या उभारणीसाठी १२ लाख रुपये खर्च आला आहे. अशा दोन क्लासरूमची उभारणी करण्यात आली असून शनिवारी सकाळी अकरा वाजता उदघाटन समारंभ आहे.

जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट, इंटेल एज्युकेशन मिलेनियम यांच्या संयुक्त विद्यमाने आॅर्किड स्कूलमध्ये दोन अद्ययावत डिजिटल क्लासरूमची उभारणी करण्यात आली आहे. टच स्क्रीनचा अत्याधुनिक प्रोजेक्टर, वेगवान संगणक, अभ्यासक्रमांसाठी खास तयार करण्यात आलेले साॅफ्टवेअर यांचा अंर्तभाव आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र लॅपटॉप, त्यात प्रत्येक विषयाचे स्वतंत्र अॅप्स, डिजिटल स्वरूपात देण्यात आले.

^जागतिक आव्हानपेलणारे विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने नागेश करजगी आॅर्किड स्कूलमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल क्लासरूमची उभारणी करण्यात आली आहे. ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या क्लासरूममधून जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल.” कुमार करजगी, संस्थापक,आर्किड

बातम्या आणखी आहेत...