आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए दर्जाच्या निवडक रेल्वेस्थानकांचे होणार डिजिटलायझेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तिकीट खिडक्यांवर लागलेली प्रवाशांची लांबच लांब रांग, माईकवर गाडीसंदर्भात होणारी वारंवार उद््घोषणा, चौकशी कक्षावर प्रवाशांची असणारी गर्दी, रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात गाडीच्या वेळा संदर्भात होणारे वाद, देशभरातील रेल्वेस्थानकांवर असणारे हे चित्र आता बदलणार आहे. कारण देशातील वन दर्जाच्या रेल्वे स्थानकांचे पूर्ण डिजिटलायझेशन होणार आहे. विमानतळांवर ज्या प्रमाणे प्रवाशांशी निगडित असणारी सर्व माहिती मोठ्या एलईडी स्क्रीनवर उपलब्ध होते त्याप्रमाणे रेल्वेगाड्या संदर्भातली सर्व माहिती स्थानकावरील मोठ्या स्क्रीनवर येईल. प्रवाशांशी निगडित असणारी सर्व माहिती प्रणाली माध्यमातून प्रवाशांपर्यंत पोहचेल.
देशातील निवडक रेल्वे स्थानके ही जागतिक दर्जाची बनविण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रकल्प आहे. स्थानके जागतिक दर्जाचे बनविताना ती विमानतळाप्रमाणे भासतील. विमानतळावर ज्याप्रमाणे मोठ्या स्क्रीनवर सर्व माहिती जाहिराती असतात तशीच रचना स्थानकांवर केली जाईल. या स्क्रीनवर रेल्वे वेळा, फलाटांची स्थिती, आरक्षित तिकिटांची उपलब्धता, यात कोणत्या रेल्वेत किती आरक्षित तिकीट उपलब्ध आहे हे समजणार आहे. हे सर्व स्क्रीन स्थानकाच्या महत्त्वाच्या भागात असतील. जेणेकरून प्रवाशांच्या नजरेत सहज पडतील. प्रवाशांशी निगडित असणारी ही माहिती विविध भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्क्रीनचा दुहेरी वापर
स्क्रीनवर प्रवाशांना सर्व माहिती उपलब्ध होईल. तर दुसरीकडे रेल्वे याच स्क्रीनवर जाहिरात प्रदर्शित करेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यामुळे रेल्वे मंत्रालयावर जवळपास ३० हजार कोटींचा बोजा पडणार आहे. तिकीट दरात वाढ करता जाहिरातीच्या माध्यमातून रेल्वे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

पायलट प्रोजेक्टमध्ये देशातील १० स्थानके
रेल्वे मंत्रालयाने पायलट प्रोजेक्टमध्ये १० स्थानकांवर हा बदल करणार आहे. यात दिल्ली, वाराणसी, जयपूर, भोपाळ, चैन्नई अादी महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश असणार आहे. पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर टप्याटप्याने देशातील वन दर्जाच्या स्थानकावर हा प्रयोग राबवतील. सोलापूर रेल्वेस्थानकाचा दर्जाच्या स्थानकामध्ये समावेश आहे.

सोलापुरात सुविधा
^देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे डिजिटलायझेशन हाेणार आहे. हे खरे आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरदेखील विविध प्रवासी सुविधेत वाढ केली जाईल. प्रवाशांच्या माहितीसाठी मोठे स्क्रीन लावले जातील. तसेच वायफायची सुविधा असणार आहे. सध्या हे जरी खूप बेसिक असले तरी दोन ते अडीच वर्षात स्थानकांचा कायापालट होणार आहे. मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक. सोलापूर
बातम्या आणखी आहेत...