आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीनदयाळ दंत महाविद्यालयात तासिकांवर बहिष्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आधीच अवाढव्य फी आणि त्यात एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाल्यास संबंधित विद्यार्थ्याकडून भरमसाठ फी उकळली जाते, असे कारण देत केगाव येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयातील पदवीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारपासून तासिकांवर बहिष्कार टाकला आहे. या आंदोलनामुळे पेच निर्माण झाला आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयात पदवीच्या अभ्यासक्रमासाठी चार वर्षांचे मिळून सुमारे ३०० विद्यार्थी प्रवेशित आहेत. संस्था बेकायदा रिपीटर फीची आकारणी करत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडेही निवेदनाद्वारे पाठवल्या आहेत. शुक्रवारी बहिष्काराचा तिसरा दिवस होता. तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत तासिकांवरील बहिष्कार चालूच राहील, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या संपात सहभागी नाहीत.

पैसा उकळणे बंद करा
^अनुत्तीर्णझालेल्या प्रत्येक विषयासाठी ३० हजार रुपये इतके अवाढव्य शुल्क महाविद्यालय उकळत आहे. अशी फी घेणे बेकायदा आहे. अशी फी घेऊ नका, असे विद्यापीठाने बजावले आहे. लाख रुपये फी भरणे विद्यार्थ्यांना कसे शक्य आहे. विद्यार्थ्यांना धमक्या देण्यात येतात. आम्ही हे कुठवर सहन करायचे? विद्यापीठाकडून परत आलेली परीक्षा फी विद्यार्थ्यांना कधीच मिळालेली नाही. ही रक्कम महाविद्यालय स्वत:कडेच ठेवत आहे. एकविद्यार्थी, दीनदयाळ दंत महाविद्यालय
तासिकांवर बहिष्कार टाकलेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या, तेव्हाचे छायाचित्र.

नियमानुसारच शुल्क
^काहीविद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना नाहक भडकावत आहेत. महाविद्यालयाकडून नियमानुसारच फी आकारणी होते. सध्या पदवी वर्गाच्या तासिका बंद आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची मुले तसेच दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात फी सवलत देण्याचा संस्था विचार करत आहे. पण चर्चेअंती हा निर्णय होईल. डॉ.आर. एस. बिरंगणे, प्राचार्य, दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय