आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ महिनाभरात, सहकारमंत्र्यांची इथे सावध उत्तरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कर्जमाफीचा अंतिम अादेश म्हणजेच बँकांमध्ये पैशांचा भरणा. ही प्रक्रिया महिनाभरात होईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे सांगितले. संबंधित शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतल्यानंतर एकूण आकडेवारी निश्चित होईल, असेही ते म्हणाले. 

त्यांच्या मंत्रिपदाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांनी वार्तालाप केला. १० हजार रुपयांच्या कर्जवाटपात जिल्हा बँक अजूनही कारणे पुढे करत आहे, ही बाब त्यांच्या निदर्शनास अाणून दिली असता ते म्हणाले, “शिखर बँक निधी देण्यास तयार अाहे. त्यासाठी बँकेचा अर्ज आणि ठराव देणे आवश्यक अाहे. दुर्दैव असे की, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्ज केला. परंतु ठराव नाही. शिखर बँकेचे व्याज शेतीकर्ज व्याजदरातील तफावत फक्त अर्धा टक्क्याची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. भागभांडवलापोटी त्यांचा पैसा वापरताच ना? त्याचा काही लाभांश वगैरे देता काय?” या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, दक्षिण साेलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी आदी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते श्री. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. 

१. मुलगा रोहन देशमुख यांच्या नावाने घेतलेली जमीन जुनी गिरणीची नाही. उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेची आहे. संस्थेने ठराव करून विकलेली ही जमीन. 
२. शेतकऱ्यांच्या नावाने कर्जे उचलण्याच्या प्रकारात गंगाखेडमध्ये चौकशी झाली. लेखापरीक्षणात दोषी धरले म्हणून गुन्हा दाखल झाला. लोकमंगलचे तसे नव्हते. 
३. नोटाबंदीनंतर लोकमंगल मल्टिस्टेटचे पैसे मुख्य कार्यालयाकडून निघाले होते. त्याची चौकशी झाली. दोष काही आढळून आला नाही म्हणून पैसे परत मिळाले. 
४. संस्थेवरील प्रशासकांचा कार्यकाळ वर्षाचा असतो. बाजार समितीची निवडणूक घ्या, असे न्यायालयाने म्हटले. पण प्रशासकांना अाणखी तीन महिन्यांची मुदत आहे. 

गारमेंट पार्कचे भूमिपूजन महिन्यांत होईल! 
नरसिंगगिरजी गिरणीच्या जागेवर गारमेंट पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन २६ जानेवारीलाच करायचे होते. महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे मुहूर्त पुढे ढकलला. त्यानंतर उच्चस्तरीय समितीशी बैठका झाल्या. दोन महिन्यांत भूमिपूजनाची तारीख काढू.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 
बातम्या आणखी आहेत...