आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिंहगड'करांच्या युवा महोत्सवात शिस्त अन् नियोजनास प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या बाराव्या युवा महोत्सवाचे 'सिंहगड'करांचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदाचा युवा महोत्सव शिस्तीला महत्त्व देणारा असेल. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व्यासपीठ देण्यास प्राधान्य असेल.

प्रत्येक महाविद्यालय संघ व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांना सूचना देऊन युवा महोत्सवात सहभागी करून घ्यावे. फेअर प्ले म्हणजे युवा महोत्सव काळात प्रत्येक महाविद्यालय संघाचे निरीक्षण परीक्षक करणार आहेत. याच गुणांवर आधारित फेअर प्लेचा चषक संबंधित महाविद्यालयाला प्रदान करण्यात येईल. बेशिस्तपणा दिसल्यास संघाचे डिपॉझिट जप्त होईल. झालेले नुकसान दंड रूपात भरून घेण्यात येणार आहे, अशी माहिती सिंहगडचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी दिली.

एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सोलापूर विद्यापीठचा बारावा युवा महोत्सव ते १२ ऑक्टोबरमध्ये होईल. नियोजनासाठी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. हनुमंत मते, सिंहगडचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्रदीप मोरे, जाकीर हुसेन मुलाणी, सिंहगड कमलापूरचे एमबीए संचालक वसीम शेख यांनी शहर जिल्ह्यातील महाविद्यालयीन सांस्कृतिक विभाग प्रमुख, संघ व्यवस्थापक यांची समन्वय बैठक घेतली. या बैठकीमध्ये युवा महोत्सवातील संभव्या अडचणी आणि सूचना जाणून घेत नियोजन संदर्भात चर्चा झाली.
मुली सिंहगड कॅम्पस तर मुले विद्यापीठ कॅम्पस
शहरजिल्ह्यातील मुलींची निवास व्यवस्था सिंहगड कॅम्पसमध्ये असेल. मुलांची निवास व्यवस्था विद्यापीठ प्रशासन करेल. शहरातील मुलांनी युवा महोत्सवात येणे जाणे स्वतंत्र करावे. विद्यापीठातून युवा महोत्सव स्थळी जाण्या-येण्यास सिंहगड कॅम्पसकडून बसची सोय असेल. युवा महोत्सवातील विद्यार्थ्यांना शहरातून सकाळ सायंकाळ बस सेवा देण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थी संघ व्यवस्थापकांना ओळखपत्र असेल. सर्व स्पर्धा रात्री दहापर्यंत होतील.