आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीच हवी! महिलांना वाटते सामाजिक स्वास्थ्य बिघडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केवळ बारमध्ये नृत्य केले म्हणजे उपजीविका कशी होऊ शकते, वेगवेगळ्या क्षेत्रातही काम करता येते. डान्सबार सुरू करूच नयेत, जर ते सुरू झाले तर सामाजिक स्वास्थ्य बिघडेल शिवाय संस्कृतीलाही तडे जातील, असे ठाम मत सोलापुरातील विविध क्षेत्रातील महिलांनी मांडले.
डान्सबार बंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक क्षेत्रात वादळी चर्चा सुरू झाली आहे. डान्सबार बंदच राहावेत, यासाठी निश्चित पावले उचलली जातील, असे सरकारकडून सांगण्यात येत असतानाच समाजातील एका गटाने डान्सबारवर बंदी नको, असा सूर लावला आहे. सामाजिक स्थैर्य आणि कुटुंब व्यवस्था अबाधित राहण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी डान्सबार पुन्हा सुरू करण्यास कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील महिलांना काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने सर्वेक्षणाद्वारे केला. सरकारने वाट्टेल ते करून डान्सबारवर बंदी घालावी, असे ९९ टक्के महिलांनी ठणकावून सांगितले. तर एका महिलेने बंदी घालण्यात आल्याने अनेक युवक या व्यसनांपासून मुक्त कसे होतील? असा सवाल करीत बंदी नको, अशी भूमिका घेतली आहे.

सुमारे ९९ टक्के महिलांना हवीय बंदी
{ उपजीविकेसाठीअनेक पर्याय आहेत.
{तरुणपिढी वाचविण्यासाठी बंदी घातलीच पाहिजे.
{सदृढसुसंस्कृत समाजासाठी गरज.
{महिलांच्यासन्मानासाठी बंदी हवीच.
{बंदीमुळेतरुणांना आणखी एका व्यसनापासून दूर ठेवता येईल.

सर्वेक्षणाचा निष्कर्ष (टक्केवारीत)
{९९टक्केमहिला म्हणतात, डान्सबारवर बंदी हवी
{एकामहिलेच्यामते डान्सबारवर बंदी आणू नये.

सर्वेक्षणात सहभाग
गृहिणी,नोकरदार, प्राध्यापक, शिक्षक, महाविद्यालयीन युवती, पोलिस कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय कार्यकर्त्या, अभियंता, डॉक्टर आदी क्षेत्रातील महिला.

‘दिव्य मराठी’ने असे केले सर्वेक्षण
‘दिव्यमराठी’ प्रतिनिधीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांशी संपर्क साधला. डान्सबार बंदीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे वृत्त तुम्ही वाचले आहे काय, अशी विचारणा केली. ज्या महिलांनी वृत्त वाचले किंवा न्यूज चॅनलवर बातमी पाहिल्याचे सांगितले त्यांना पुढील तीन प्रश्न विचारले.

१. सरकारने डान्सबारवर बंदी घालावी का?
२. डान्सबार म्हणजे उपजीविकेचे साधन आहे, असे डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे. ते योग्य वाटते का?
३. डान्सबारवर बंदी घालावी असे वाटत असेल तर त्यामागची कारणे काय? बंदी घालू नये, असे वाटत असल्यास त्यामागची कारणे काय?

बंदी विरोधी महिलांच्या मते
{बंदी घालण्यात आल्याने अनेक युवक या व्यसनांपासून मुक्त कसे होतील? ज्यावर बंदी घातली जाते ते अधिक व्यापक होते, त्यातून समाजात अनेक गैरप्रकारच घडू शकतात. कायदेशीर संरक्षण मिळेल, म्हणून बंदी घालण्याची गरज नाही.