आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्ट सिटीतील संचालक मंडळ निवडीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिका सभागृहाने यापूर्वी चार सर्वपक्षीय नगरसेवकांचा समावेश करत १५ जणांची निवड केली. ती नावे शासनाने कमी करून दोन संचालक निकष लावून निवडण्याचे आदेश दिले. त्यासाठी महापालिका सभागृहासमोर दोन संचालक निवडीसाठी तातडीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने ठेवला. यावर शुक्रवारी होणाऱ्या मनपा सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने यापूर्वी पंधरा संचालकाची निवड केली. त्यात नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया, मनोहर सपाटे, चेतन नरोटे, जगदीश पाटील यांचा समावेश होता. शासनाने ही नावे वगळून सभागृहातील संख्याबळानुसार उतरत्या क्रमांकाच्या राजकीय पक्षाची दोन संचालक नियुक्त करावे असे सूचवले. त्यानुसार सभागृहापुढे विषय अाहे. शासनाने सूचवलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रतिनिधित्व मिळेल. प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावास महापालिका सभागृहात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने पूर्वी केलेला ठराव पुन्हा होण्याची शक्यता आहे.

हक्कावर गदा येत असेल तर स्मार्ट सिटी नको
शासनाने सांगितल्या प्रमाणे१५ संचालक मंडळाचा नावासह ठराव केला. त्यात शासनाने चार नावांची कपात केली आणि दोन संचालक निवडण्याचा निकष लावले. आमच्या हक्कावर गदा नको. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आम्ही ठराव करणार आहे. तसे होत नसेल तर आम्हाला स्मार्ट सिटी नको. संजय हेमगड्डी, मनपा सभागृह नेते