आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठांचा अभ्यासक्रम पाच वर्षांनी बदलणार; सावित्रीबाई फुले पुरस्काराचे वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये बी. कॉमच्या अकाउंटन्सी व अर्थशास्त्र अभ्यासक्रम बदलाविषयी विचारणा केली. विविध कुलगुरूंनी अॅकॅडमी कौन्सिलची बैठक व्हायची आहे अशी उत्तरे दिली. देशात जीएसटी लागू झाली तरी विद्यापीठामध्ये सेल्स टॅक्स शिकवला जातोय. जीएसटी येणार आहे हे दहा वर्षांपासून चर्चा आहे तरीदेखील अभ्यासक्रमात समावेश केला नाही. काळानुरूप शिक्षण बदलणे गरजेचे असून अाता दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम बदलणार आहे. त्याची सुरुवात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून केली आहे,’ असे प्रतिपादन  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी साेमवारी केले.  

 राज्याच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण समारंभ हुतात्मा स्मृती सभागृहात आयोजित केला होता. त्याप्रसंगी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणमंत्री बोलत होते.  पुरस्कार प्राप्त शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील १०७ जणांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सोलापुरातील बाळे अंबिका नगर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सरस्वती पवार व माध्यमिक शाळांमधील निर्मला ठोकळ प्रशालेतील अाशा भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख दहा हजार, रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.  

यावेळी शिक्षण मंत्री तावडे म्हणाले, सध्या विद्यार्थी फेसबुक, ट्यूटर, इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहिती गोळा करीत आहेत, त्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वेगळी माहिती देण्यासाठी प्रयत्न करावा. काळानुरूप  शिक्षकांनी अपडेट राहणे गरजेचे आहे.
 
अाॅनलाइन पुरस्कारांमुळे गुणवंतांना न्याय  
ऑनलाइन शिक्षक पुरस्काराची घोषणा केल्याने तीन वर्षांपासून गुणवत्ताधारकांना पुरस्कार मिळतोय, ज्यांना पुरस्कार दिलेल्या शिक्षकांवर शंका असेल, त्यांनी ऑनलाइन सर्व माहिती उपलब्ध आहे, त्याची पाहणी करावी, जर शंका असतील शिक्षण संचालकांकडे तक्रार करावी, त्या तक्रारीनंतर तपासणी संचालक म्हमाणे करतील. असे शिक्षणमंत्री यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...