आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष, सामाजिक संघटनेचा मदतीचा हात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब- तालुक्यातील नायगाव पाडोळी येथील शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर चौथ्या दिवशी पतीच्या निधनाचे दुख: सहन न झाल्याने पत्नीनेही स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला आठ दिवस उलटून गेले आहेत. अद्याप शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली. त्यामुळे शासनाचा कारभार कसा सुरू आहे, हे दिसून येत आहे.

पाडोळी येथील महेंद्र देवकते यांची पाडोळी शिवारात शेती आहे. चार वर्षापासून सततची नापिकी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज, खासगी सावकार, उसनवारीने घेतलेले पैसे कसे फेडायचे या विवंचनेत त्यांनी २४ जून २०१६ रोजी स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर आता जगायचे कसे मुलींचे संगोपन करायचे कसे या विवंचनेत पत्नी सुप्रीया टेकाळे हिनेही स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेची प्रशासनाने कोणतीही दखल घेतल्याचे देसून येत नसून अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. नापिकी कर्जबाजारीपणामुळे पती-पत्नीने आत्महत्या केली तरी आद्यप प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. मात्र, दिलासा सामाजिक संस्था (यवतमाळ) वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था (कळंब) यांच्या वतीने प्रा. अनिल अनीगुंठे यांनी टेकाळे कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची मदत केली आहे. यावरून प्रशासन सुस्तावले असल्याचे दिसून येत आहे. मात्र सामाजिक संस्थांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत.
पतीच्या आत्महत्येनंतर अवघ्या चार दिवसांत म्हणजेच २८ जून २०१६ रोजी सुप्रीया टेकाळे हिने आत्महत्या केली होती. या संदर्भात तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, आद्यपही जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मान्य झालेला नाही. त्यामुळे टेकाळे कुटुंबीयांना अद्याप प्रशासकीय मदत मिळालेली नाही.
तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव
दिलासा वसुंधरा सामाजिक संस्थेच्या वतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...