आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माने, पाटील, हसापुरेंनी अर्ज नेले; संचालकांचे वारसदारही पुढे आले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी विद्यमान अध्यक्ष दिलीप माने, उपाध्यक्ष बबन आवताडे, संचालक सुरेश हसापुरे, जयवंतराव जगताप, राजन पाटील, रश्मी बागल, समाधान आवताडे हे अर्ज घेऊन गेले. अक्कलकोटचे माजी आमदार आणि या बँकेचे संचालक सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील यांनी अर्ज घेऊन भरूनही टाकले. विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून त्यांचा अर्ज दाखल झाला.
सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. अर्ज विक्री अाणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या कार्यालयात प्रचंड गर्दी होती. जिल्हाभरातून सभासद आणि संस्थांचे प्रतिनिधी आले होते. त्यांना बसण्याची आणि पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. बँकेच्या १९ जागांसाठी ही निवडणूक आहे. सोमवार (ता. २३)पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर मंगळवारी आलेल्या अर्जांची छाननी होईल.
मतदारसंघनिहाय विक्रीस गेलेले अर्ज (कंसात संख्या)

सत्ताधारी संचालकांची आज बैठक
जिल्हादूध उत्पादक संघाच्या निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकोपा ठेवण्यासाठी बँकेच्या ज्येष्ठ संचालकांची शुक्रवारी सायंकाळी ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या सभागृहात बैठक होणार आहे. बँकेच्या ११ विकास सेवा साेसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक निवडणूक लढवणार आहेत. बँकेशी संलग्न असलेल्या संस्था मतदारसंघांची फेररचना झाल्याने या ठिकाणी उमेदवारीवरून तिढा पडण्याची शक्यता आहे. तो सोडवण्याचा प्रयत्न ज्येष्ठ मंडळी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. नव्या मतदारसंघ रचनेनुसार पाडापाडी टाळण्याचा प्रयत्न राहील
Áबँकेस संलग्नअसलेल्या पतपेढ्या, विविध कार्यकारी संस्था, कृषक सेवा सोसायट्या, शेतकी सोसायट्या यांच्या वतीने प्रत्येक तालुक्यातून एक संचालक या प्रमाणे ११ जागा (४१)
Áमहिला प्रतिनिधीजागा (१४)
Áअनुसूचित जातीजमाती सदस्य जागा ०१ (०८)
Áइतरमागास वर्गातील सदस्य जागा ०१ (७)
Áभटक्याजाती,विमुक्त जमाती जागा ०१ (७)
Áकृषीपणन संस्था, शेतमाल प्रक्रिया संघ : साखर कारखाने, तेल गिरण्या, सूत गिरण्या आदी जागा ०१ (०८)
Áइतरशेती संस्था : जिल्ह्यातील दुग्ध संस्था, व्यक्ती सभासद जागा ०१ (०७)
Áनागरी सहकारीबँका, पतसंस्था, पगारदार नोकरांच्या पतसंस्था, ग्राहक सोसायट्या आदी जागा ०१ (११)

वारसदार आले पुढे
बँकेच्या विद्यमान संचालकांनी यंदाच्या निवडणुकीत आपल्या वारसांना पुढे केले आहे. त्यात अक्कलकोटचे माजी आमदार आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील अग्रेसर ठरले. त्यांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतला अन् भरूनही टाकला. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत पाटील यांनीही अर्ज घेतला. दक्षिण तालुक्याच्या राजकारणात रंग दाखवणारे सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव स्वप्निल यांच्या नावेही अर्ज नेल्याची नोंद आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. दुसरीकडे बँकेतील गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्याचे काम ‘कलम ८८’ अन्वये सुरू आहे. या बाबी समोर ठेवून वारसदार आणले जात असावेत.