आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवरत्न’च्या मालमत्तेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पहिला हक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिवरत्न उद्योग समूहाच्या विजय शुगर (करकंब) आणि आलेगाव येथील शंकररत्न शुगरला इतर बँकांच्या अगोदर कर्ज दिले. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांच्या मालमत्तेवर पहिला हक्क जिल्हा बँकेचाच असल्याची माहिती अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली.
दोन्ही कारखान्यांना बँक ऑफ महाराष्ट्र सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने ११२ कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्याच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सिक्युरिटायझेशन अॅक्टखाली दोन्ही कारखान्यांचा ताबा मिळवला. त्याची पहिली नोटीस एप्रिल २०१४ रोजी दिली आहे. ६० दिवसांची मुदत देऊनही ताबा मिळाला नाही. त्यामुळे २३ जुलै २०१४ ला आणखी एक नोटीस पाठवली. दरम्यानच्या काळात शिवरत्न उद्योगाला इतर बँकांकडून कर्ज घेण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. त्यात पहिला हक्क जिल्हा बँकेचाच असेल, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.”

अडकले ३३२ कोटी
शिवरत्न उद्योग : १५५ कोटी ८५ लाख
आर्यन शुगर : १७६ कोटी ३४ लाख

न्यायालयात जाऊ
^ऊसपुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपी -प्रमाणे बिल दिल्याने बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरवर जप्तीची कारवाई करण्यात आली. लिलाव प्रक्रियेत कोणीही सहभागी होत नसल्याने या कारखान्याच्या मालमत्तेवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातून शासनाचे नाव लावण्यात आले आहे. या कारखान्यावर जिल्हा बँकेचे कर्ज असताना ही मालमत्ता शासनाच्या नावावर कशी काय होऊ शकते? या संदर्भात आम्ही न्यायालयात जाणार आहे.” राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक

बातम्या आणखी आहेत...