आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेतर्फे बुधवारी शेतीनिष्ठ पुरस्कारांचे वितरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हापरिषद कृषी पशुसंवर्धन विभागतर्फे देण्यात येणाऱ्या शेतीनिष्ठ पुरस्कारांचे वितरण बुधवारी (दि.१२) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येईल, असे कृषी सभापती आप्पाराव कोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सभापती कोरे म्हणाले, “गेल्या दोन वर्षांतील पुरस्कारांचे वितरण यंदाच्यावर्षी होईल. बुधवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांचे वितरण होईल. या कार्यक्रमास आमदार बबनराव शिंदे, आमदार दिलीप सोपल, आमदार हनुमंत डोळस, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्यासह सर्व आजी-माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आदी उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह साडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमास सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती कोरे यांनी केले.

सन २०१६-१७ मधील शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते
व्हन्नाप्पा कोळी (अंकलगे, अक्कलकोट), उत्तम जाधव (घाणेगाव, बार्शी), गोरख लबडे (शेटफळ, करमाळा), संजय पाटील (नातेपुते, माळशिरस), नितीन कापसे (कापसेवाडी, माढा), अंकुश खताळ (शिरनांदगी, मंगळवेढा), समाधान पाटील (सोहाळे, मोहोळ), गौराप्पा पुजारी (वडापूर, दक्षिण सोलापूर), तानाजी पवार (होनसळ, उत्तर सोलापूर), अनिल पवार (कोन्हापुरी, पंढरपूर), दत्तात्रय जानकर (शिवणे, सांगोला), आप्पासाहेब कोळी (सादेपूर, दक्षिण सोलापूर)
सुभाष सनगंदी (बोरोटी, ता. अक्कलकोट), तानाजी खंडागळे (तांबडी, बार्शी), महेंद्र पाटील (बिटरगाव, करमाळा), सुनील ढेरे (देवळाली, करमाळा), सुब्रान दुपडे (कोळेगाव, माळशिरस), जयवंत भोसले (बेंबळे, माढा), भारत दत्तू (दत्तूगल्ली, मंगळवेढा), आबासाहेब शिंदे (अनगर, मोहोळ), दयानंद हल्ले (आहेरवाडी, दक्षिण सोलापूर), प्रभाकर बिडवे (कळमण, उत्तर सोलापूर), अतुल बागल (गादेगाव, पंढरपूर), दुर्योधन घुले (हणमंतगाव, सांगोला)

अजित पवारांच्या भाषणाकडे राजकीय अभ्यासकांच्या नजरा
जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली आहे. शिक्षक आंतरजिल्हा बदली, पोषण आहार, गौण खनिज घोटाळा यासह अनेक गैरप्रकार उघडकीस आलेत. त्या विरोधात अध्यक्षा जयमाला गायकवाड पक्षनेते धैर्यशील मोहिते यांनी ठोस निर्णय घेतले नाहीत. वरिष्ठ नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मतभेद गटबाजी अधिकच वाढली. जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार काय बोलणार? याकडे राजकीय अभ्यासकांच्या नजरा आहेत.
बातम्या आणखी आहेत...