आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Court Buildings Ingratiation On Waiting In Pandhari

पंढरीत जिल्हा न्यायालय इमारत उद्घाटनास विलंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - येथील सांगोला रस्त्यालगत सुमारे १८ कोटी ६० लाख रुपये खर्चून आधुनिक पद्धतीने आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी जिल्हा न्यायालयाची इमारत बांधण्यात आली. त्याचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तरीही या इमारतीच्या उद्घाटनासाठी नुसती तारीख पे तारीख दिली जात आहे.

येथील अर्बन बँकेच्या मुख्य शाखेजवळ सध्या जुने तर सांगोला रस्त्यावरील बिडारी बंगल्यात जिल्हा न्यायालय आहे. या दोन्ही न्यायालयांमधील दीड ते दोन किलोमीटर अंतरामुळे न्यायालयीन कामकाज करताना वकील, पक्षकार यांची तारांबळ उडते. त्यामुळे एकाच इमारतीतून सर्व कामकाज चालावे या हेतूने नव्या इमारतीची मागणी होत होती. माजी आमदार सुधाकर परिचारक, आमदार भारत भालके बारच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाला मंजुरी मिळाली.

नोव्हेंबर २००९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या हस्ते या बांधकामाची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यासाठी नऊ कोटींची तरतूद होती. १८ महिन्यात काम पूर्ण होण्याची अपेक्षा न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी व्यक्त केली होती. मात्र, निधीमुळे हे काम रखडले होते. नंतर निधी उपलब्ध झाल्यावर हे काम पूर्ण झाले.

गटबाजीमुळेअडचण : येथीलबार कौन्सिलच्या सदस्यांत दोन गट आहेत. त्याचाही न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनात अडचणी आहेत. इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत वाद उपस्थित करून त्याचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात येत असल्याचीही वकिलांमध्ये चर्चा आहे.
उद्घाटन कार्यक्रमाची तयारी नाही

मुंबईउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी ११ अथवा १२ जुलै या न्यायालयाच्या इमारत उद्घाटनासाठी तारीख दिल्याने याच्या उद्घाटनाची चर्चा होती. मात्र, अद्याप त्या कार्यक्रमाची तयारी दिसत नाही.

तीन मजली इमारत
याइमारतीत ग्राउंड फ्लोअर, पहिला मजला दुसरा मजला अशी स्वतंत्र तीन मजल्यांची रचना आहे. ग्राउंड फ्लोअरवर चार, पहिल्या मजल्यावर चार आणि दुसऱ्या मजल्यावर दोन न्यायाधीशांची दालने आहेत.

देशातील तीस इमारतींमध्ये समावेश
देशातनव्याने बांधलेल्या आधुनिक सर्वसोयीसुविधांनी युक्त न्यायालयाच्या ३० इमारतींमध्ये पंढरपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा समावेश आहे. त्याच्या बांधकामावर खास सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण होते. वेळोवेळी त्यांच्या सूचनेनुसार त्याच्या आराखड्यात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.

स्ट्रॉँगरूमच्या लोखंडी दरवाज्यांसाठी प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये खर्च झाला आहे.
त्यासाठी दहा न्यायाधीशांची स्वतंत्र दालने, कर्मचारी वर्गासाठी स्वतंत्र खोल्या, अद्ययावत ग्रंथालय, वकिलांचा बार

काही ठळक वैशिष्ट्ये
उपाहारगृह, अशिलांसाठी आसन व्यवस्था, साक्षीदारांसाठी स्वतंत्र कक्ष, आरोपींसाठी स्वतंत्र कारागृह, चोरीमध्ये सापडलेला जप्त मालासाठी सहा स्वतंत्र स्ट्राँगरूमची व्यवस्था आहे.
पंढरपूर येथे अत्याधुनिक पद्धतीने सर्व सोयीसुविधांनी युक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, त्याचे अद्याप उद्घाटन झाले नाही. छाया : राजू बाबर.

आमच्यात गटतट नाहीत
बारअसोसिएशनमध्ये गटतट नाहीत. गैरसमज पसरवले जात आहेत. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उद्घाटनाचा पत्ता नसल्याने गैरसोय होत आहे. त्याचे त्वरित उद्घाटन व्हावे.'' अॅड.किरण घाडगे, अध्यक्ष, बार असोसिएशन, पंढरपूर

यांचे वजन ११ ते २३ कि.ग्रॅ. पर्यंत असते
मादी २७ ते ३७ इंच लांब तर शेपटी २४ ते ३२ इंचाची असते. नर मादीपेक्षा मोठा असतो.
तो ३२ ते ४३ इंच लांब शेपटी २९ ते ३६ इंच लांब असते. जबड्यात अत्यंत तीक्ष्ण मजबूत सुळे असतात.