आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम, प्रलंबित खटले लागेल मार्गी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हाविधी सेवा प्राधिकरणच्या वतीने घेण्यात आलेल्या महालाेक अदालतीत शनिवारी शहरातील जवळपास ११४ प्रकरणे निकाली लागली. यातून तब्बल लाख ६९ हजार ५१४ रुपयांची तडजोड झाली आहे. तर जिल्ह्यात झालेल्या निकालात १२८ प्रकरणे तडजोडीत निघाली अाहेत.
शनिवारी झालेल्या महालोक अदालतीत पॅनल क्रमांक मध्ये जिल्हा न्यायाधीश एस. आर. उगले यांच्यासमोर ५६ प्रकरणे ठेवली होती. त्यात प्रकरणाचा निकाल लागला. क्रमांक दोनच्या पॅनलमध्ये तिसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. डी. मोरे यांच्याकडे ८८ प्रकरणे होती. त्यातील निकाली लागले. तिसऱ्या पॅनलसाठी वरिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एच. एस. भोसले यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे १४२ प्रकरणे होती. त्यातील ३३ प्रकरणांचे निकाल लागले.

पॅनल क्रमांक चारला कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश ए. ए. देशपांडे यांच्याकडे ३०१६ प्रकरणे होती. त्यातील ३१ प्रकरणांचे निकाल लागले. तर पॅनल पाचमध्ये सहदिवाणी न्यायाधीश मुनसिपल कोर्टचे डी. व्ही. कुटे यांनी काम पाहिले. यात एकूण २१४ प्रकरणे होती. त्यातील ४९ प्रकरणांचा निकाल लागला. चार पॅनलसमोर ३५१६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११४ निकाली काढण्यात आली. एकूण लाख ६९ हजार ५१४ रुपयांच्या रकमेची तडजोड झाली. महालोक अदालत असल्याने आज सकाळपासूनच शहर जिल्ह्यांतील नागरिकांची न्यायालयात गर्दी होती.

ग्रामीण भागातील १२८ केसेस काढली निकाली
जिल्ह्यातील इलेक्ट्रीसिटीशी निगडित ३१६१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३६ निकाल लागले असून यात लाख ४० हजार ८१० रुपयांची तडजोड झाली. टेलिफोनसंदर्भात २६३७ प्रकरणे होती. त्यातील ८४ निकाल लागले असून याव्दारे लाख ६३ हजार ७४५ रुपयांची तडजोड झाली. पब्लिक युटीलायझीसंदर्भात ३१८६ प्रकरणे होती. त्यातील २८६ निकाल झाले असून याव्दारे लाख १८ हजार ४६३ रुपयांची तडजोड झाली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण दाखलपूर्व ६९३९ प्रकरणे होती. त्यातील १२८ निकाल लागले असून १३ लाख २६ हजार ४३७ रुपये तडजोडीव्दारे तक्रारदारांना मिळाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...