आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने बांधली मोट, नमलेल्या शिवसेनेचे एका जागेवर समाधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -शिवसेनेच्या विरोधात भाजपने मोट बांधली असून, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसप यांना आपल्या बाजूने खेचत ७५ नगरसेवकांची बेरीज गाठली. तर स्वत:चे २१ आणि एमआयएमचे चार असे एकूण २६ सदस्य शिवसेनेच्या बाजूने राहिले. मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राजकीय डाव आखला. पण तो यशस्वी झाला नाही. उलट त्यांची गोची झाली. २१ नगरसेवक असूनही एका जागेवर समाधान मानावे लागले. 
 
शिवसेनेने सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून महापालिकेच्या विषय समिती निवडीत आणि अंदाजपत्रक मंजुरीत सत्ताधारी भाजपला एकटे पाडत जेरीस आणले होते. मात्र, आता सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, बसपचे आनंद चंदनशिवे, काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्याकडील मते फोडण्याची कसब कामी आली. शिवसेना दोन तर एमआयएम एक अशा तीन जागांची मागणी शिवसेनेने केली होती. पण दोन जागा देण्याची तयारी भाजपने दाखवली. शनिवारी स्थायी समितीच्या सभागृहात महेश कोठे, सुरेश पाटील, संजय कोळी यांच्यात बैठक झाली. बसपकडे चारच नगरसेवक असताना एक जागा देण्यात आली. काँग्रेसला एक जागा देण्यात आली. मात्र, चार नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला एकही जागा देण्यात आली नाही. 

सातजागा बिनविरोध 
नऊपैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. अन्य दोन जागांपैकी एका ठिकाणी भाजपचे दोन अर्ज तर दुसऱ्या जागेसाठी एमआयएमकडून दोन अर्ज आले आहेत. पक्षाच्या आदेशानंतर एकेक अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. 
 
जिल्हा नियोजन समितीच्या ४० जागांपैकी १३ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित २६ जागांसाठी ५५ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघातील सात, महापालिकेच्या पाच तर नगरपंचायतीच्या एका जागेचा समावेश आहे. सोमवारी छाननी होणार आहे. २५ जुलै ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. शनिवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. 
जिल्हा परिषद मतदारसंघात २६ जागांसाठी ४२ अर्ज आले होते. यापैकी सर्वसाधारण महिलेच्या सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. मागास वर्गातील चार जागांसाठी आठ अर्ज आले आहेत. तर याच वर्गातून महिलांच्या चार जागांसाठी पाच अर्ज आले आहेत. सर्वसाधारण वर्गातून पुरुष सात जागांसाठी १२ अर्ज आले. महिलांच्या सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. अनुसूचित जाती वर्गातील दोन जागांसाठी पाच तर महिलांच्या दोन जागांसाठी चार अर्ज आले आहेत. बिनविरोध झालेल्या सात जागा वगळल्यास १९ जागांसाठी ३४ अर्ज आले आहेत. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी अर्ज आला नाही. त्यामुळे ३९ जागांसाठी ६९ अर्ज आले आहेत. 
महापालिका मतदारसंघातील नऊ जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित चार जागांसाठी सहा अर्ज आले आहेत. अनुसूचित जाती वर्गातील एका जागेसाठी दोन अर्ज तर सर्वसाधारण महिला वर्गातील तीन जागांसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. नगरपालिका मतदारसंघात तीन जागांसाठी १५ अर्ज आले आहेत. सर्वसाधारण वर्गातील एका जागेसाठी १५, अनुसूचित जाती महिला वर्ग मागास वर्गाच्या एका जागेसाठी प्रत्येकी तीन अर्ज आले आहेत. 

बिनविरोध होण्याची शक्यता 
जिल्हापरिषद महापालिका मतदारसंघातील मागास वर्ग महिला महापालिका मतदारसंघातील अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे चित्र पाहता निम्म्याहून अधिक बिनविरोध होणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे नगरपंचायतीच्या तीन जागांसाठी रस्सीखेच दिसून येते. येथे सर्वसाधारणच्या एका जागेसाठी नऊ अर्ज आले आहेत. 

बिनविरोध उमेदवार 
जिल्हा परिषद : सर्वसाधारण महिला प्रवर्गातून राणी वारे, संगीता डोईफोडे, शैला गोडसे, ऋतुजा मोरे, विद्युल्लता कोरे, मंगल वाघमोडे ज्योती पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी संगीता डोईफोडे यांचे दोन अर्ज वगळता इतर उमेदवारांचा प्रत्येकी एक अर्ज आहे. यामुळे या सर्व जागा बिनविराेध झाल्या आहेत. 

महापालिका : सर्वसाधारण प्रवर्गातून अमोल शिंदे, आनंद चंदनशिवे, नागरिकांचा मागास प्रवर्गातून अमर पुदाले तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यातून मेनका राठोड प्रतिभा मुदगल बिनविरोध झाले आहेत. नगरपंचायत मतदारसंघातून मीनल साठे यांचा एकच अर्ज असल्याने बिनविरोध झाल्या आहेत. 
 
बिनविरोध केल्याचा आनंद 
^एकूणनऊ सदस्य बिनविराेध करण्यात यश आल्याने आनंद झाला. यांची कल्पना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दिली होती. त्यांनी मला सर्व अधिकार दिले हाेते.” सुरेशपाटील, सभागृह नेता, महापालिका 

असे आहेत अर्ज दाखल 
केलेले नगरसेवक 
मागासवर्गीयगट : वंदना गायकवाड/ सुभाष शेजवाल (भाजप) 
ओबीसी : अमर पुदाले (भाजप) 
महिला ओबीसी : प्रतिभा मुदगल, मेनका राठोड (भाजप) 
खुला : आनंद चंदनशिवे (बसप), अमोल शिंदे (शिवसेना) 
खुला महिला : संगीता जाधव (भाजप), फिरदाेस पटेल (काँग्रेस), तस्लीम शेख/वहिदाबी शेख (एमआयएम) 

‘सहकार’ गटास दोन जागा 
भाजपात सहकार पालकमंत्री गट असून, पाच पैकी पालकमंत्री गटाचे वंदना गायकवाड, अमर पुदाले, प्रतिभा मुदगल यांना संधी देण्यात आली तर सहकारमंत्री गटाचे मेनका राठोड आणि संगीता जाधव यांची वर्णी लागली. 
बातम्या आणखी आहेत...