आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा महिला रुग्णालयावर वाढला ताण; बेडअभावी जमिनीवर उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्हा महिला रुग्णालयात दररोज रुग्णांच्या संख्येत भर पडत असताना वाढीव खाटांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. खाटांअभावी महिलांवर जमिनीवर उपचार करण्यात येत आहेत. काही महिलांना तर जिन्याखाली आडोसा घ्यावा लागत आहे. प्रशासनाने तात्पुरती सोय म्हणून शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात उपचाराची सोय केली होती. मात्र, रुग्णांनी त्यासाठी प्रतिसाद दिला नाही.
तीन वर्षापूर्वी उस्मानाबादेत जिल्ह्यातील पहिले महिला रुग्णालय सुरू झाले. वास्तविक, ६० खाटांचे हे रुग्णालय तुलनेने अपुरे असल्याने वाढीव रुग्णालयाचा प्रस्ताव उद््घाटनापूर्वीच तयार करण्यात आला होता. मात्र यंत्रणेला उद््घाटनाची घाई झाली आणि अपुऱ्या सोयी असतानाच रुग्णालयाचा वापर सुरू झाला. सद्यस्थितीत ६० खाटांच्या या रुग्णालयात सुमारे १५० महिला दररोज उपचार घेतात. त्यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. दोन डॉक्टरांवर हा सगळा भार असल्याने तेही मानसिक तणावाखाली काम करीत आहेत. महिन्यापूर्वी एका डॉक्टरला शस्त्रक्रिया विभागातच हृदयविकाराचा झटका आला होता. कामाच्या ताणातून आरोग्यसेविकांचा कधी कधी संयम ढळतो, त्यातून वादावादीचे प्रकार घडत आहेत. अपुऱ्या सोयीमुळे महिला रुग्णांचेही हाल होत आहेत. वेळेत उपचार मिळत नसल्याने काही महिला दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांना या प्रकाराची वारंवार यंत्रणेकडून मािहती देण्यात आली; मात्र, वाढीव रुग्णालयाचा प्रस्ताव पुढे सरकत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे यंत्रणेसह रुग्णांचे हाल मात्र सुरूच आहेत.रुग्णालयात दररोज ३० पेक्षा अधिक महिला प्रसूतीस दाखल होत आहेत.
ग्रामीणभागात दुर्लक्ष :जिल्ह्यातील महिलांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालय गाठावे लागते. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातून महिलांना रेफर करण्याचे प्रमाण वाढल्याने महिला रुग्णालयावर ताण वाढला आहे. ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रुग्णाच्या नातेवाइकांचा यंत्रणेवरचा विश्वास उडत आहे.

‘आयुर्वेदिक’रुग्णांची पाठ :महिला रुग्णालयावर ताण येत असल्याने प्रशासनाने प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला रुग्णांना शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्व यंत्रणा तयार केली. मात्र महिला आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल होण्यासाठी तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.

हॉलमध्ये जमिनीवर उपचार
रुग्णांची गैरसोय कमी होण्यासाठी महिला रुग्णालयाची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. इमारत उभी करताना ६० खाटांची क्षमता होती. मात्र, ही चूक यंत्रणेच्या लक्षात आल्यानंतर वाढीव रुग्णालयाचा प्रस्ताव करण्याचे ठरले.प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र, तीन वर्षापासून कार्यवाही होत नाही. अधिक संख्या वाढल्याने जमिनीवर उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...