आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : कासेगावचे 1000 वर्षांपूर्वीचे हेमाडपंती महादेव मंदिर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर नक्षीकामात मढलेले पुरातन शिवमंदिर - Divya Marathi
सुंदर नक्षीकामात मढलेले पुरातन शिवमंदिर
सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे जवळपास १००० वर्षांपूर्वीचे हेमाडपंती शंभू महादेव मंदिर पुरातन वास्तूकलेचा नमुना आहे. मंदिरातील गाभाऱ्यात दीड ते दोन फूट उंचीवर सिंहासनावर शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिंहासनावर शिवलिंग दुर्मिळ असल्याचे येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात. सकाळच्या वेळी सूर्याची किरणे लिंगावर पडतात अशी मंदिराची रचना आहे. मंदिर अतिशय सुबक रेखीव आहे. मंदिरातील दगडावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरातील दगडी खांब कोरीव आकर्षक आहेत. 
 
शिखरावर हनुमान इतर देवदेवतांच्या मूर्ती आहेत, वरच्या बाजूला १२ ज्योतिर्लिंग आहेत. लिंगासमोर पितळी धातूचा नंदी आहे. मंदिराशेजारी त्याच पद्धतीची गणपती बळी देवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत. तसेच चाफ्याचे झाड आहे. मंदिरात पहाटे सायंकाळी पूजा आरती केली जाते. चैत्र महिन्यात सात दिवस यात्रा भरते. शंभू महादेवाच्या यात्रे पूर्वी गंगेवाडी कासेगाव येथील ग्रामस्थ कावड शिखर शिंगणापूरला नेतात. तेथून कावड परत आणून मंदिरात पूजा करून गावातून मिरवणूक काढतात. श्रावणातील दर सोमवारी पूजा बांधली जाते. या पूजेसाठी विविध फळांचा वापर केला जातो. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिर खूप पुरातन असून प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आपल्या शहराच्या जवळ आहे. धार्मिक पर्यटनाला उत्तम पर्याय आहे. मंदिर बाराव्या किंवा तेराव्या शतकातील असावे असा अंदाज आहे. 
 
पुढील स्लाइडवर, उगम पावलेले महादेवाचे लिंग भाविकांचे श्रद्धास्थान...पुढील स्लाइडवर, उगम पावलेले महादेवाचे लिंग भाविकांचे श्रद्धास्थान...
बातम्या आणखी आहेत...