आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : पाेलिसी छळाने अभियंत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्राधिकरणाची आयुक्तांना नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’ने या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केली. यासंदर्भात पाठपुरावा केला. १४ २१ जुलै रोजी प्रकाशित केलेले वृत्त. - Divya Marathi
‘दिव्य मराठी’ने या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केली. यासंदर्भात पाठपुरावा केला. १४ २१ जुलै रोजी प्रकाशित केलेले वृत्त.
सोलापूर - पोलिसांच्या छळाला कंटाळून जुलैला फासावर लटकलेल्या आणि सुदैवाने वाचलेल्या अजय नराल प्रकरणाची दखल राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाने स्वत:हून (सु-मोटो) घेतली. थेट पोलिस आयुक्त महादेव तांबडे आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांना नोटीस बजावली. २४ ऑगस्टला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. ‘दिव्य मराठी’ने दिलेल्या बातम्यांची नोंद घेत प्राधिकरणाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली. स्वत:हून दखल घेण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. 
 
जुन्या विडी घरकुलमधील श्रीकृष्ण वसाहतीत राहणारा अजय हा उच्च शिक्षित तरुण. त्याला सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, पोलिस शिपाई नरेश कामूर्ती आणि इतरांनी एका खंडणी प्रकरणात अडकवले. त्यानंतर सातत्याने त्याला दमदाटी करत छळ केला. त्याला कंटाळून अजयने जुलैच्या रात्री आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी चिठ्ठी लिहिली. त्यात कोल्हाळ, कामूर्ती, गिरीश कड्याल, विशाल शिंदे यांची नावे आहेत. घरातील पंख्याला दोर बांधून त्यावर तो लटकला. आईचे लगेच लक्ष गेले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारानंतर तो वाचला. या प्रकरणाची नोंद पोलिसांत झाली. परंतु अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नाही. अजयच्या आई-वडिलांनी आयुक्त तांबडे यांना भेटून वस्तुस्थिती सांगणारे निवेदन दिले. परंतु महिना उलटला तरी चौकशीचे कागदी घोडे नाचवण्याशिवाय दुसरे काम झाले नाही. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाची नोटीस मिळाली आणि नराल कुटुंबीयांना दिलासा मिळाला. 
 
आईचे लगेच लक्ष गेले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारानंतर तो वाचला. या प्रकरणाची नोंद पोलिसांत झाली. परंतु अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नाही. अजयच्या आई-वडिलांनी आयुक्त तांबडे यांना भेटून वस्तुस्थिती सांगणारे निवेदन दिले. परंतु महिना उलटला तरी चौकशीचे कागदी घोडे नाचवण्याशिवाय दुसरे काम झाले नाही. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाची नोटीस मिळाली आणि नराल कुटुंबीयांना दिलासा मिळाला. 
 
काय आहे प्राधिकरण? 
पोलिसांच्या गैरकृत्यांवर अंकुश ठेवणारी आणि पीडितांना न्याय मिळवून देणारी हे प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारी न्यायिक संस्था आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत पोतदार हे त्याचे अध्यक्ष असून, निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रेम कृष्णन, समाजातील मान्यवर व्यक्ती म्हणून उमाकांत मिटकर आणि निवृत्त आयएएस अधिकारी एन. रामाराव हे त्याचे न्यायिक सदस्य अाहेत. पोलिसांकडून होणारा छळ, अत्याचार आदी प्रकरणांवर प्राधिकरण काम करते. मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे त्याचे कार्यालय आहे. 
 
...अन् जागे झाले 
प्राधिकरणाने दखल घेतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या उपायुक्त अपर्णा गीते यांनी नराल यांना मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे पत्र दिले. 
 
> अजय सुदैवानेवाचला म्हणून कुणीच दखल घेतली नाही. पोलिस यंत्रणेने आमची अवहेलना केली. प्राधिकरणाचे पत्र पाहून बरे वाटले. कुठे तरी न्याय आहे, याचा विश्वास वाटला. मल्लेशनराल, अजयचे वडील 
बातम्या आणखी आहेत...