आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : स्वातंत्र्यदिनी 10 हजार वंचितांपर्यंत पोहोचवणार एक पोळी नि भाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देश स्वतंत्र झाला, पण त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत अद्याप गेला नाही... महागाईच्या काळात दोनवेळचा घास घेणे कठीण झाले... रात्रीच्या काळोखात पाणी पिऊन पदपथावर झोपणारे अनेक पाहिले... त्यांच्यासाठी आपण काय करतो..? काही देण्याची दानत असते, पण तिथे पोहोचायचे कसे? हा प्रश्न असतो... अशांसाठी धावून आलाय चक्क रॉबिनहूड आर्मी... 
 
होय, स्वातंत्र्यदिनी १० हजार लोकांपर्यंत जाऊन अन्न देण्याचा विडा या आर्मीने उचललाय... त्यांना द्यायचंय, फक्त एक पोळी आणि थोडी भाजी... स्वातंत्र्यदिनी या विधायक उपक्रमांत सहभागी होण्याची संधी सोलापूरकरांना मिळतेय... 
 
प्रा. हिंदूराव गोरे यांच्या संकल्पनेतून रॉबिनहूड आर्मीचे संघटन झाले. शहर आणि परिसरात कुणी भुकेला राहू नये, याची काळजी घेणारी ही संस्था. किमान स्वातंत्र्यदिनी तरी वंचितांना अन्न देण्याची धडपड करत त्याचे कार्यकर्ते सज्ज झाले. शहरातील विविध ठिकाणांहून ‘एक पोळी अन् थोडी भाजी’ घेऊन वंचितांच्या दारापर्यंत नेऊन देण्याचे नियोजन केलेे. फक्त देणाऱ्याचे हात पुढे येण्याची वाट पाहताहेत. आपण हाक द्या, अन्न पोहोचवणारे सैनिक तयार. 
 
वाया जाणाऱ्या अन्नातून... 
- हॉटेल, मंगलकार्यालयांत वाया जाणारे अन्न घेऊन रॉबिनहूड आर्मीने गेल्या दोन महिन्यांत हजार लाेकांचे पोट भरले. पण, स्वातंत्र्यदिनी गरमागरम आणि ताजे अन्न द्यायचे आहे. सकाळी वाजल्यापासून या उपक्रमास सुरुवात होईल. एक पोळी आणि थोडी भोजी घेऊन हाक द्या, या क्रमांकावर ९२७२६७९७९७.” प्रा.हिंदूराव गोरे, रॉबिनहूड आर्मीचे प्रमुख 
 
संकलन केंद्रेही सज्ज 
सम्राट चौकातील महेश कॉलनी, अशोक चौक येथील किंग अँड क्वीन बर्गर येथेही पोळी-भाजी संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जमा अन्न एका स्वच्छ पॉकेटमधून वंचितांच्या दारी जाईल. त्यासाठी आकाश मुस्तारे, पियुशा दीक्षित, संदेश घोडके, श्रीकांत महागावकर, सुजित बिराजदार, सायण्णा कोळी, चेतन शर्मा, सौरभ सिंदगी, आकाश व्होरा, वेदमूर्ती म्हेत्रे, निखिल काळे, तौसिफ मुजावर, विशाल चिगरी आदी आर्मीचे सदस्य तयार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...