आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: रेल्वेमार्ग बदलल्याने ‘स्वाभिमान’ दुखावला; गैरसमजुतीने गाेंधळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दिल्लीतील माेर्चासाठी काेल्हापूरहून अारक्षित केलेली विशेष रेल्वे परतीच्या प्रवासात भरकटल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला हाेता. मात्र प्रत्यक्षात नियाेजित  मथुरा ते कोटा मार्ग व्यग्र असल्यामुळे ही गाडी  मथुरा ते आग्रामार्गे नेण्यात अाली, असा दावा रेल्वे विभागाने केला अाहे. मात्र गाडीचा मार्ग अचानक बदल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाेंधळ घातला. त्यात भर टाकली ती झांशी रेल्वे विभागातील बानमोर  रेल्वेस्थानकाच्या स्थानक व्यवस्थापकांनी. या अधिकाऱ्यास विशेष रेल्वेसंदर्भातला संदेश  उशिरा पोहोचला, तापेपर्यंत त्यांनी गाडी पुढे सोडण्यास नकार दिला. मात्र नंतर नियंत्रण कक्षातून संदेश मिळताच गाडी पुढे म्हणजे आग्र्याच्या दिशेने रवाना करण्यात अाली.    


देशातील शेतकरी संघटनांच्या वतीने साेमवारी दिल्लीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अांदाेलन करण्यात अाले. या अांदाेलनात सहभागी हाेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर ते दिल्ली व दिल्ली ते कोल्हापूर विशेष रेल्वे बुक केली होती. जाताना ही गाडी कल्याणमार्गे अहमदाबाद, सुरतमार्गे गेली. परतीच्या प्रवासात मात्र गाडीचा नियाेजित मार्ग दिल्ली-कोटा-सुरतमार्गे कोल्हापूर असा होता. मात्र हा मार्ग व्यग्र होता त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री २ वाजून ५५ मिनिटांनी गाडी मथुरा स्थानकावर पोहोचल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मार्गात बदल केला. मथुरा स्थानक हे जंक्शन आहे. येथून मार्ग उपलब्ध आहेत. एक सुरतकडे येणारा, तर दुसरा आग्रा, ग्वाल्हेर, झांशी, भोपाळ, मनमाडमार्गे कोल्हापूरकडे जाण्याचा. 


रेल्वे प्रशासनाने दुसरा मार्ग निवडून गाडी ग्वाल्हेरमार्गे सोडली. मथुरा ते आग्रा मार्गावर बानमोर रेल्वेस्थानक आहे. हे मथुरापासून  १६० किमी अंतरावर आहे.  सकाळी साडेसहाच्या सुमारास ही गाडी बानमोर स्थानकावर अाली. आग्रा नियंत्रण कक्षातून झांशी रेल्वे नियंत्रण कक्षाला या गाडीचा संदेश देण्यात आला. मात्र हा संदेश झांशी नियंत्रण कक्षातून बानमोर स्थानकात मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे तेथील व्यवस्थापकाने ‘स्वाभिमानी’ची रेल्वे स्थानकावरच थांबवून इतर गाड्यांना प्राधान्य दिले. सुमारे दाेन तास ही गाडी बानमोर रेल्वे स्थानकावर उभी होती. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा संताप  अनावर झाला. त्यांनी या ठिकाणी गांेधळ घातला. मात्र संदेश मिळाल्यानंतर ही गाडी ग्वाल्हेर, झांशी, भोपाळ, इटारसी, मनमाडमार्गे कोल्हापूरच्या दिशने मार्गस्थ झाली. 


रेल्वेमंत्र्यांकडे केली चाैकशीची मागणी   
ही विशेष रेल्वे चुकीच्याच मार्गाने धावली. हे प्रकरण मी रेल्वेमंतर्यांपर्यंत पोहाेचवल्याने रेल्वे आपली चूक लपवण्यासाठी आता मार्ग बदलल्याची सारवासारव करीत आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे करणार आहे.   
- राजू शेट्टी, खासदार व अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना


अडथळे टाळण्यासाठी रेल्वेचा मार्ग बदलला  
विशेष रेल्वेचा जो मार्ग आधी ठरला होता त्या मार्गावर गाड्यांची संख्या जास्त होती. स्वाभिमानीच्या गाडीला मार्ग उपलब्ध करणे अवघड गेले असते. या गाडीला ठिकठिकाणी थांबवावे लागले असते. यापेक्षा गाडी पर्यायी मार्गाने धावने कधीही ठीक. हा विचार करून मथुरा स्थानकावरून नियोजित मार्गाऐवजी गाडी पर्यायी मार्गावर धावली. यात काहीही चुकीचे झाले नाही.   
- अनिलकुमार सक्सेना, अतिरिक्त महासंचालक, जनसंपर्क, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली   

बातम्या आणखी आहेत...