आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजार गजबजले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदर | करमाळा शहरास जिल्ह्यात दीपावली सणानिमित्त खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे. तसेच येथे बुधवारी आठवडी बाजारात कपडे, किराणा इतर साहित्य खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची गर्दी दिसली. पंढरपूर, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, कुर्डुवाडी, मंद्रूप, माढा येथील बाजारपेठा ग्राहकांनी गजबलेल्या आहेत.
ग्रामीण भागातील बाजारांमध्ये दीपावलीसाठीच्या साहित्य वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. यात रांगोळी, रंग, पणत्या, विद्युत दिवे, आकाशकंदील, फराळाचे पदार्थ, कपडे,गृहसाजावाटीच्या वस्तूंचा समावेश आहे.

लहान मुले किल्ला बनवण्यात गुंतले आहे. त्यासाठी लागणारे मावळे इतर साहित्य खरेदीसाठी बच्चे कंपनी गर्दी करत आहे. घरासमोर किल्ला बनवण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. यंदा बाजारात आकाश कंदील ५० रुपये ५०० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. तसेच दिवाळीसाठी चिनी बनावटीच्या फटाके, पणत्या आदी वस्तू खरेदी करण्याविषयी सोशल मीडियातून संदेश फिरत आहेत. चीनने पाकिस्तानला समर्थन दिल्याने तरुण त्यांच्या वस्तू वापरण्याविषयी जनजागृती करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...