आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजन सायंकाळपासून तर पाडवापूजन पहाटेपासून मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदाच्या दिवाळीत ३० अाॅक्टोबर रोजी लक्ष्मी-कुबेर पूजनाचा मुहूर्त सायंकाळपासून वेगवेगळ्या टप्प्यात तर ३१ अाॅक्टोबर रोजी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त असून वही पूजनाचा मुहूर्त पहाटे ०१।३५ पासून वेगवेगळ्या टप्प्यात सुरू होत अाहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
दरम्यान दिवाळीनिमित्तच्या खरेदीसाठी फूल, पूजेचे साहित्य, कपडे विविध वस्तू विक्रीसाठी बाजारपेठा सज्ज अाहेत. बुधवारी रमा एकादशीपासून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात होत अाहे.
गोधनाची म्हणजे गाईची पूजा आश्विन वद्य द्वादशीला करतात. संध्याकाळी गायी चरून आल्यानंतर गाय- वासरांची गंधादी उपचारांनी पूजा करून ‘क्षीरोदार्णवसंभूते सुरासुरनमस्कृते सर्वदेवमये मातर्गुहाणार्घ्यं नमोऽस्तु ते ।’ हा मंत्र म्हणून पुढील पायावर अर्घ्य द्यावे ‘सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि ।’ दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळत स्त्रियांनी एकभुक्त राहावे. सवत्स गायीची पूजा करावी.

धनत्रयोदशी: २८ऑक्टोबर - आश्विन वद्य त्रयोदशीला वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ. उपवास करून घरातले द्रव्यालंकार साफ करतात पूजन करून पुनश्च योग्य ठिकाणी ठेवतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्य-निधी यांची पूजा करून नैवेद्य दाखवितात, यथाशक्ती दान करतात. सायंकाळी दिवा घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवावा. संध्याकाळी मातीचा किंवा कणकेचा दिवा हा दक्षिणेकडे ज्योत करून ठेवावा. मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामया सह त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम असा मंत्र म्हणून दिव्यास नमस्कार करावा.आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरीची पूजा करावी.

नरकचतुर्दशी : २९ऑक्टोबर - भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध उर्वरितपान
आश्विनकृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. म्हणून पहाटे अभ्यंगस्नान करावे. शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावावे स्वच्छ स्नान करत यमतर्पण करावे. “यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः। भूताधिपो दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्जपंति।।” हा श्लोक १० वेळा म्हणावा. सध्याला अपघाताचे भय वाढले आहे, त्यामुळे होणारा अपमृत्यूचा संभव टाळण्यासाठी यमाची प्रार्थना करावी.

लक्ष्मी-कुबेरपूजन : ३०ऑक्टोबर - शेतकऱ्यांची जशी वेळ अमावास्या, त्याप्रमाणे व्यापारीवर्गासाठी ही अमावास्या शुभ आहे. या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. म्हणून सूर्यास्तानंतर लक्ष्मी-कुबेर पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धी - यासाठी प्रार्थना करावी. लक्ष्मीकुबेराची प्रार्थना करावी. पूजेत साळीच्या लाह्या वापराव्यात.

लक्ष्मीपूजनमुहूर्त :सायं. ०६।०५ ते रात्री ०९।१०, रात्री ०९।३० ते ११
बलिप्रतिपदा(पाडवा): ३१ऑक्टोबर - हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. या कार्तिक शुक्ल प्रतिपदेस कीलक नावाचे विक्रम संवत्सर सुरू होत आहे. व्यापारी वर्षाची सुरुवात म्हणून वहीची दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते.

वहीपूजन मुहूर्त : पहाटे०१।३५ ते ४, पहाटे ते सकाळी ०८।१५, सकाळी ०९।५० ते ११।२०
यमद्वितीया(भाऊबीज) : नोव्हेंबर- कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले आहे.

बळीराजाच्या वरामुळे दिवाळीस महत्त्व
^नरकचतुर्दशीते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौजमजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात राहावे, अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त आहे.” मोहनदाते, दाते पंचांगकर्ते
बातम्या आणखी आहेत...