आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘होमिओपॅथीं'साठी अॅलिओ पॅथी कोर्स, महिनाअखेरपासून अभ्यासक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होमिओपॅथी डॉक्टरांसाठी अंशकालीन अॅलिओपॅथीचा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. नोव्हेंबरअखेर तो सुरू होणार आहे. यामुळे होमिअोपॅथिक संघटनेचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटला आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून ५५ हजार रुपये शुल्क आहे.
सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्माक्युलॉजिस्ट हा अभ्यासक्रम आहे. ऑक्टोबरमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने एकमताने मंजूर केला. प्रस्ताव दाखल केलेल्या महाविद्यालयांची चालू आठवड्यात तपासणी केली. त्यानुसार आठ शासकीय महाविद्यालयांत तो सुरू झाला आहे.
अभ्यासक्रम शनिवार रविवार असा दोन दिवस शिकवण्यात येणार आहे. एकंदर वर्षभरात ५०० तासांचे नियोजन करण्यात आले आहे.

दहा शासकीय महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी अंबाजोगाई, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, धुळे, नांदेड, पुणे, सोलापूर येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय होमिओपॅथिक संघटनेने हा अभ्यासक्रम िवनाअनुदानित िकंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून खासगी महाविद्यालयात होण्याची शक्यता आहे.

राज्यात दहा ठिकाणी सोय
आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे अॉलिओपॅथिकचा अंशकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी १० शासकीय महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी अंबाजोगाई, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, धुळे, नांदेड, पुणे, सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही लवकरच सुरू होईल.

ज्येष्ठतेनुसार प्रवेश
^अंशकालीन एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवेश ज्येष्ठतेनुसार देण्यात येणार आहे. सरासरी सुरुवातील राज्यातून १० हजार डॉक्टारांना प्रवेश दिला जाईल. आठवड्यातून दोन दिवस फार्मक्युलॉजिस्टचा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे.” अरुणबस्मे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक


दिव्य मराठी विशेष