आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाच्या वर्षी लाच घेण्यात डॉक्टरही, जुन्या प्रकरणात सात जणांना शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लाचघेण्यात सर्व शासकीय विभागांचे नाव तर आलेच आहे. मात्र यंदाच्या २०१५-१६ या वर्षी अक्षरश: डाॅक्टरांचेही नाव यामध्ये आले. वर्षभरात एकूण ३५ ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्यात आली.
प्रशासनाच्या लालफीतशाहीत काहीजणांकडून लोकांची कामे मुद्दाम अडवली जातात. यामुळे जनतेचा वेळ आणि पैसा खर्च होतो. अखेर त्रस्त झालेला नागरिक वैतागून लाच देतो आणि आपली कामे करून घेतो. लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे धाव घेतात. हे प्रमाण खूपच कमी आहे.

जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ यादरम्यान ३५ घटनांमध्ये ४० जणांना अटक करण्यात आली. यात प्रथम श्रेणीतील अधिकारी २, द्वितीय श्रेणीतील अधिकारी ७, तृतीय श्रेणीतील अधिकारी २३, चतुर्थ श्रेणीतील अधिकारी २, इतर कर्मचारी खासगी प्रकरणात व्यक्ती यांचा स्मावेश आहे. चर्चेतीलप्रकरणे : ईएसआयहॉस्पिटल येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय वैद्य, तुंगत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी कदम, डॉ. शहाजी राऊत, सांगोला येथील नगराध्यक्ष, बार्शी येथील सहाय्यक निबंधक उमेश पवार, वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी रमेश कुलकर्णी, एमआयडीसी ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण देवकर, वैरागचे मुख्याध्यापक धन्यकुमार मोरे यांची प्रकरणे चर्चेत राहिली.

यांनाझाल्या शिक्षा :ग्रामीण पोलिसातीलपोलिस हवालदार नुरुद्दीन शेख यास दोन वर्षाची शिक्षा, मनपामधील कनिष्ठ लिपीक शंकर कनकय्या दासरी यास एक वर्षाची शिक्षा, जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी रवींद्र भगवान महिंगडे यास दोन वर्षाची शिक्षा, अक्कलकोट येथील तलाठी भीमशा तुकाराम खांडेकर यास एक वर्षाची शिक्षा, तलाठी रावसाहेब श्रीपती शेलार यास दोन वर्षाची शिक्षा, मोहोळ पोलिस ठाण्यातील पांडुरंग पोपट लोखंडे यास दोन वर्षाची शिक्षा, मोडनिंब भूमी अभिलेख कार्यालयातील सतीश ढेरे यास वर्षाची शिक्षा लागली.

-जुन्या प्रकरणातसात आरोपींना शिक्षा मिळाली आहे. लाच घेऊही नये आणि देऊही नये. तसेच जो कोणी लाचेची मागणी करत असेल अशांनी लाच लुचपत प्रतिबंधात्मक कार्यालयाशी संपर्क साधावा.”
अरुणदेवकर, सहाय्यक पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...