आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतील चेन ओढल्यामुळे डॉक्टरला गुलबर्ग्याला नेले, RPF जवानांच्या अजब शिक्षेमुळे मनस्ताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरयेथे आयोजित कॉन्फरन्ससाठी आलेल्या महिला डॉक्टरला आरपीएफच्या गलथान कारभारामुळे चांगलाच मनस्ताप झाला. सोबत आलेले कुटुंबातील सदस्य गाडीतच राहिल्याने त्यांनी शताब्दी एक्स्प्रेसची चेन ओढली. मात्र त्यामुळे गाडीत एस्कॉर्टिग करणारे आरपीएफ जवान त्यांना थेट गुलबर्गा येथे घेऊन गेले. तेथे त्यांच्याकडून जबाब घेऊन पुन्हा सोडण्यात आले. केवळ चेन ओढल्याची ही अजब ‘शिक्षा’ डॉक्टरांना मिळाली. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. 

शनिवारी सोलापुरात डॉक्टरांची परिषद होती. त्यासाठी डॉ. रश्मी गुजराती कुटुंबीयांसमवेत शताब्दी एक्स्प्रेसने पुण्याहून सोलापुरात सी डब्यातून उतरल्या. शताब्दीला केवळ ते मिनिटांचा थांबा आहे. प्रत्येक प्रवासी घाईने उतरत होते. डॉ रश्मी यांच्या समोरच्या प्रवाशाकडे सामान खूप होते. त्यामुळे गुजराती कुटुंबाला डब्यातून उतरायला विलंब झाला. डॉ. रश्मी त्यांचे पती डब्यातून उतरले अन् गाडी सुरू झाली. लहान मुलगी सासू आत राहिल्याने ते दोघे पुन्हा डब्यात चढले. गाडी थांबवण्यासाठी चेन ओढली. गाडीने फलाट सोडले नव्हते. ते लगेच खाली उतरले. फलाटावरून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच डब्यातील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्यांना गुलबर्ग्याला चला असे फर्मावले. ते त्यांना गुलबर्ग्याला घेऊन गेले. तेथे त्यांच्याकडून जबाब नोंदवला त्यांना सोडण्यात आले. ते पुन्हा उद्यान एक्स्प्रेसने सोलापूरला आले. 

डब्यात गर्दी असल्याने शताब्दीच्या थांब्याच्या वेळेत माझ्या कुटुंबीयांना उतरता आले नाही. म्हणून चेन ओढली. तर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी मला गुलबर्ग्याला नेले. सोलापूर स्थानकावर माझा जबाब नोंदवला असता तर माझा वेळ वाचला असता. मला माझ्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. 
- डॉ.रश्मी गुजराती, प्रवासी. 

शताब्दीला एस्कॉर्टिंगस्टाफ पुणे विभागाचा आहे. नेमके काय घडले याची चौकशी करतो. कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. 
- डी.विकास, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पुणे. 

नियम काय सांगतो? 
प्रवाशांच्याजीवाला धोका असेल, डब्यात आग लागली असेल अथवा धूर असेल, सोबतचे प्रवासी खाली राहिले अथवा गाडीत राहिले, गाडीतून कुणी खाली पडले अथवा खिडकीला कुणी लटकत असल्यास चेन ओढल्यास कोणतीही कारवाई होत नाही. जबाब नोंदणीचे काम सोलापूर स्थानकावरही झाले असते. 
बातम्या आणखी आहेत...