आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्रा चोरल्याचा संशय, दोन तरुणांवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कुत्रा चोरल्याच्या संशयावरून अाठ तरुणांनी मिळून दोघांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना पश्चिम मंगळवार पेठेजवळील खान मशिजदजवळ घडली. तेजस दिनेश कारंजे ( रा. पश्चिम मंगळवार पेठ) याच्यासह रणजित जाधव यांच्यावर हल्ला झाला. कारंजे याने फाैजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली अाहे. अादित्य लोमटे, नागेश ब्रिदी, अक्षय ब्रिदी, राकेश पवार, राकेश कासेगाव, रवी बिराजदार, बालाजी गजेली, मुकेश अन्य सहा तरुण (यांची नावे पूर्ण नाहीत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे.

तेजस हा घराजवळ मित्रांसोबत बोलत बसला होता. त्यावेळी वरील सर्व संशयितांनी सळई, गज, काठ्या घेऊन जाधव याला कुत्रा चोरल्याच्या संशयावरून मारहाण करू लागले. त्यावेळी जाधव तेजस या दोघांवर हल्ला झाला. काठ्या दगड फेकण्यात अाले.