Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Donation For Mill, Ambulance, School Bus, Hall From Sallery

पगारातला वाटा काढून दिले पिठाची गिरणी, रुग्णवाहिका, स्कूल बस, हॉल

एमएसईबी उपअभियंता संघटना एमएसईबी अभियंता सहकारी पतसंस्था या दोन्ही संघटनेने गेल्या २० वर्षांपासून पगारातला काही वाटा काढ

म. युसूफ शेख | Oct 09, 2017, 09:18 AM IST

  • पगारातला वाटा काढून दिले पिठाची गिरणी, रुग्णवाहिका, स्कूल बस, हॉल
सोलापूर-एमएसईबी उपअभियंता संघटना एमएसईबी अभियंता सहकारी पतसंस्था या दोन्ही संघटनेने गेल्या २० वर्षांपासून पगारातला काही वाटा काढून गरजू होतकरूंना मदतीचा हात पुढे केला आहे. आजपर्यंत त्यांनी स्कूल बस, पाण्याची टाकी, रुग्णवाहिका, हॉल बांधून देणे आदी अनेक मदतीचे कार्य त्यांनी केले आहे.

समाजाचे देणे लागतो या विचाराने आपल्या पगारातून काही तरी रक्कम गरजूंना द्यावी, असे २० वर्षांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटले. यावर चर्चा झाली अन्् सर्वानी एकमताने मंजुरी दिली. प्रथम बोटावर मोजण्याइतकेच सदस्य होते. प्रत्येक महिन्याच्या पगारातून प्रथम दहा रुपये जमा करण्यात आले. आता शंभर रुपये दिले जात आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे पाच वर्षे या संस्थेचे हे सामाजिक कार्य थांबले होते. पण पुन्हा सुरू करत असल्याचे सांगण्यात आले.

यंदा स्कूल बस भेट
इंदिरानगर येथील जाणीव जागृती संस्थेला स्कूल बस भेट म्हणून दिली जाणार आहे. मोहोळ येथील भारतमाता आदिवासी समाज भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना चादर, टॉवेल, सतरंजी देण्यात येणार आहे.

यंदा उपक्रम राबवू
गेल्या वीस वर्षांपासून ही संस्था समाजकार्य करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून काही तांत्रिक कारणामुळे कार्य थांबले होते. मात्र आता पुन्हा नव्याने तेच आणि तसेच कार्य सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा दिवाळी दरम्यान आम्ही हा मदत करण्याचा उपक्रम राबवणार आहोत.
- एन.एम. गयाळे, सहसचिव

अाजपर्यंत दिलेली मदत
जिव्हाळासंस्थेस स्वर नियंत्रण यंत्र, पिठाची गिरणी, गोपाळपूर पंढरपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमास रुग्णवाहिका, मोहोळ मलिक पेठ येथील मागासवर्गीय वसतिगृहास हॉल बांधून दिले, सोलापूर सात रस्ता येथे पिण्याची टाकी बांधून दिली.

Next Article

Recommended