आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगरे हल्ला; आणखी एकास पोलिस कोठडी, शेटफळमध्ये पुन्हा बेमुदत बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेटफळ - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील संशयित चारजणांना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि. २७) शेटफळ (ता. मोहोळ) मध्ये बंद पाळण्यात आला. संशयितांना अटक होईपर्यंत गाव बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपसरपंच दत्तात्रय वागज यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डोंगरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी १३ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार संशयित हे गायब आहेत. ११ एप्रिल रोजी डोंगरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर गाव बंद पुकारण्यात आला होता. परंतु ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेमुळे बंद मागे घेण्यात आला होता. परंतु १५ दिवासांनंतरही पाेलिसांनी उर्वरित संशयितांना अटक केल्याने पुन्हा गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रवादीकाँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आणखी एकास संशयितास पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) अटक केली. त्याला येथील न्यायालयात उभे केले असता २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. चंद्रकांत लक्ष्मण भांगे (वय ४९ रा. शेटफळ, ता. मोहोळ) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अटकेतील संशयितांची संख्या आता नऊ झाली आहे.

राजकीय वैमनस्यातून ११ एप्रिल रोजी शेटफळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डोंगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी डोंगरे यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आठ संशयितांना यापूर्वीच अटक झाली असून ते पोलिस कोठडीत आहेत. पोलिस उर्वरित सहा संशयितांच्या शोधात होते. मंगळवारी संशयित चंद्रकांत भांगे याला अटक करण्यात आली. बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली.

^माझे वडीलशुद्धीवर आले आहेत. त्यांच्यावर आवश्यक सर्व शस्त्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. त्यांची प्रकृती आता पूर्णपणे धोक्यातून बाहेर आली आहे.” विजयराज डोंगरे, माजीसभापती, मोहोळ

तपासात प्रगती, शोध सुरू
^तपासात प्रगती झाली आहे. तपास पथकामार्फत उर्वरित संशयितांचाही शोध सुरू आहे. तातडीने त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल.” अभय डोंगरे, उपविभागीयपोलिस अधिकारी