आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान यंत्राविषयी शंका, न्यायालयात 63 खटले; खर्च सादर केलेल्या 20 जणांची सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका निवडणुकीत मतदानयंत्र (ईव्हीएम) सदोष असल्याचे सांगत ६३ पराभूत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर तीन जणांनी इतर कारणासाठी न्यायालयात गेले आहेत. 

अॅड. उमा पारसेकर यांनी राजश्री चव्हाण यांच्या तीन अपत्याबाबत दावा दाखल केला. मतदानाबाबत बिज्जू प्रधाने यांनी दाखल केला. माजी नगरसेवक दिलीप कोल्हे यांनी मतदान केलेल्याची यादी मागितली असता, मनपा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले असता त्यानुसार त्यांना यादी दिली नाही. 

सर्वच राजकीय पक्ष, सर्व नगरसेवकांनी निवडणूक खर्चाची माहिती सादर केली. २० जणांनी खर्च सादर केलेला नाही. त्यांना विभागीय आयुक्तांनी नोटीस दिली असून, दोन मे रोजी पुण्यात सुनावणी होणार आहे अशी माहिती महापालिका निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. 

महापालिका निवडणूक लढवली. त्यांनी निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत हिशेब देणे आवश्यक होते. सर्व नगरसेवकांसह अन्य पराभूत उमेदवारांनी हिशेब दिले. तर सुशांत कांबळे, सना बागवान, वंदना मोरे, सचिन उबाळे, सुवर्णा घोडके, सचिन अक्कलकोटे, महादेव अलकुंटे, वृषाली चव्हाण, विजया कावळे, दिगंबर आखाडे, महेंद्र नाकते, विजया कोथिंबीरे, रूपाली तोडकरी, सुनील बुजरंगे, अमर पवार, सविता बहिरवाडे, वनिता मोटे, रेहाना बागवान, गालिब कुरेशी यांनी हिशेब दिला नाही. त्यांना मे रोजी विभागीय आयुक्तांनी सुनावणीसाठी बोलावले आहे. 

बसपने दिली नाही निवडणूक खर्चाची माहिती 
महापालिकानिवडणुकीसाठी खर्च केलेली माहिती यापूर्वी प्रमुख राजकीय पक्षाने दिले. बसपने खर्चाची काहीच माहिती दिली नाही. राजकीय पक्षाने सादर केलेल्या खर्चावर मनपा लेखापरीक्षक कार्यालयाकडून तपासणी करण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...