आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोव्हेंबरअखेर दौंड ते भिगवण विद्युतीकरणाचे काम होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मनमाडते दौंडदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दौंड ते भिगवणदरम्यानचे काम वेगाने सुरू अहे. नोव्हेंबरअखेर हे काम पूर्ण होईल, असा विश्वास वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता, व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केला.


दौंडपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने आता मनमाड ते पुणे दरम्यानप्रवासी रेल्वेगाड्या विद्युत इंजिनवर धावण्यास सुरुवात झाली आहे.


दौड ते भिगवण जवळपास २६ किमीचे अंतर आहे. या मार्गावर पूर्णपणे आता विद्युत पोल उभारले गेले आहेत. पोल उभारल्यानंतर ओव्हरहेड वायरिंगचे कामही पूर्ण झाले आहे. ओव्हरहेडचे वायरिंग पूर्ण झाले असले तरी आणखी काही वायरिंग काम मात्र शिल्लक राहिले आहे. उर्वरित कामे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. काम झाल्यानंतर त्याची पाहाणी मुख्य संरक्षक आयुक्त यांच्याकडून होईल. त्यांच्या मंजुरीनंतरच विद्युत इंजिनवर गाड्या धावण्यास सुरुवात होईल.


दुहेरीकरणाचाखोडा
सोलापूरते दौंडदरम्यान आरव्हीएनएलकडून रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. दुहेरीकरणाचे काम आता वाकावपर्यंत आले आहे. वाकाव ते भिगवण होण्यास आणखी वर्ष ते दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जोपर्यंत दुहेरीकरण पूर्ण हाेणार नाही तोपर्यंत विद्युतीकरणाचे काम करता येणार नाही. त्यामुळे या कामात दुहेरीकरणाचे खोडा ठरणार आहे.


सोलापूर विभागाच्या सूचना
गाड्यांचावेग वाढवणे, गाड्या वेळेवर धावण्यासाठी प्रयत्न करणे, स्थानकासोबत रेल्वे डब्यात स्वच्छता कायम ठेवावी, ऑन बोर्ड हाऊस किपिंग ही सेवा निवडक गाड्याएेवजी सर्वच गाड्यांमध्ये सुरू करावी, वन दर्जाच्या स्थानकावर लिफ्टसोबत सरकते जिने बसविणे, केवळ लांबपल्ल्याच्या गाड्यांनाच नव्हे तर सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पॅन्ट्रीकारची सेवा देणे, स्थानकावरील सर्व स्टॉल बंद करणे आदी प्रमुख सूचना आहेत.


मनमाडते दौंडदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दौंड ते भिगवणदरम्यानचे काम वेगाने सुरू अहे. नोव्हेंबरअखेर हे काम पूर्ण होईल, असा विश्वास वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता, व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...